scorecardresearch

Premium

शंभरावे नाट्यसंमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात…

हा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व विश्वस्त मंडळाच्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सभेत घेण्यात आला.

100th theater conference akhil bharatiya marathi natya parishad march next year mumbai
शंभरावे नाट्यसंमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात…

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे नाट्यसंमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात होणार आहे. त्याचबरोबर, २०२३ – २०२४ च्या शतक महोत्सवी मराठी नाट्य संमेलनानिमित्त विभागीय स्तरावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व विश्वस्त मंडळाच्या मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त सभेत घेण्यात आला.

mpsc passed engineers not get appointment letter
एमपीएससी उत्तीर्ण अभियंत्याना वर्षभरानंतरही नियुक्तीपत्र नाही; आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण
nagpur agreement burned in chandrapur, vidarbha state movement committee, vidarbha state movement committee
नागपूर करार विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक – ॲड. वामनराव चटप; विराआंस समितीने केली नागपूर कराराची होळी
rajbhasha
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे पुण्यात अखिल भारतीय राजभाषा संमेलन
All India Coordination Meeting rss
पुण्यात १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान आरएसएसची अखिल भारतीय समन्वय बैठक; मोहन भागवत, जे.पी. नड्डा उपस्थित राहणार

या सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यातील महत्त्वाचे म्हणजे, चंद्रपूर गडचिरोली परिसरात ‘झाडीपट्टी’ या वैदर्भीय शैलीतील नाट्यप्रकाराने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. याचे लेखन व सादरीकरण यातील वैविध्यामुळे ही नाट्यशैली थोड्याच कालावधीत एक आकर्षण बनले आहे. रंगभूमीला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या कला प्रकाराचे राज्याच्या इतर भागातही सादरीकरण व्हावे, अशी सूचना या सभेत उदय सामंत यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The 100th theater conference of akhil bharatiya marathi natya parishad will be held in the month of march next year mumbai print news dvr

First published on: 30-06-2023 at 18:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×