scorecardresearch

मुंबईत उद्या पार पडणार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन

खासदार सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर, नीलम गोऱ्हे करणार मार्गदर्शन

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या स्थापनेस उद्या (दि.२५ जानेवारी) २९ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त मुंबईत मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’ २९ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा उपसभापती निलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रियांका सावंत, निर्मला सावंत-प्रभावळकर, विजया रहाटकर, सुशिबेन शाह या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. याशिवाय चंद्रा अय्यंगार, अ.ना. त्रिपाठी, आस्था लूथरा, श्रद्धा जोशी, या महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सोबतच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.

सदर कार्यक्रम कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन ४५ लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोविड नियमांमुळे प्रवेश फक्त निमंत्रितांनाच आहे. कार्यक्रम लाईव्ह https://www.facebook.com/Maharashtra-state-Commission-For-Women-महाराष्ट्र-राज्य-महिला-आयोग-101703202320849/ या लिंक वर पाहता येईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The 29th anniversary of maharashtra state womens commission will be celebrated in mumbai tomorrow msr

ताज्या बातम्या