राज्यामध्ये सुरु असणाऱ्या अभुतपूर्व सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष मागील काही दिवसांपासून दिसून येत असतानाच शिवसेनेची बाजू पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत प्रसारमाध्यमांसमोर मांडताना दिसत आहेत.

बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबरोबरच पक्षप्रमुखपदही सोडण्याची ऑफर बंडखोर आमदारांना दिली. राज्यातील या सत्तासंघर्षामध्ये शिंदे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता बंडखोर नेत्यांना थेट आव्हान देणारी बॅनर्स मुंबईत झळकल्याची चित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नगरसेविकेने लावलेल्या या बॅनर्सवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांचा फोटो झळकत आहे.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

शिवसेनेच्या नगरसेविका दिपमाला बढे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर नावासहीत हा बॅनर झळकावला आहे. या बॅनरवर, “तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खांदानी है” अशा ओळी लिहिण्यात आल्या असून संजय राऊतांचा आक्रमक फोटो दिसत आहे.

सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.