एकनाथ शिंदे प्रकरण : "तेरा घमंड तो चार दिन का है पगले..."; संजय राऊतांच्या घरासमोर झळकले बॅनर्स | The banner has been put up by Shiv Sena Corporator Deepmala Badhe scsg 91 | Loksatta

एकनाथ शिंदे प्रकरण : “तेरा घमंड तो चार दिन का है पगले…”; संजय राऊतांच्या घरासमोर झळकले बॅनर्स

सध्या राऊतांच्या घरासमोर लावलेल्या बॅनर्सचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

एकनाथ शिंदे प्रकरण : “तेरा घमंड तो चार दिन का है पगले…”; संजय राऊतांच्या घरासमोर झळकले बॅनर्स
हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे (फोटो एएनआयवरुन साभार)

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या अभुतपूर्व सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष मागील काही दिवसांपासून दिसून येत असतानाच शिवसेनेची बाजू पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत प्रसारमाध्यमांसमोर मांडताना दिसत आहेत.

बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबरोबरच पक्षप्रमुखपदही सोडण्याची ऑफर बंडखोर आमदारांना दिली. राज्यातील या सत्तासंघर्षामध्ये शिंदे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता बंडखोर नेत्यांना थेट आव्हान देणारी बॅनर्स मुंबईत झळकल्याची चित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नगरसेविकेने लावलेल्या या बॅनर्सवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांचा फोटो झळकत आहे.

शिवसेनेच्या नगरसेविका दिपमाला बढे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर नावासहीत हा बॅनर झळकावला आहे. या बॅनरवर, “तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खांदानी है” अशा ओळी लिहिण्यात आल्या असून संजय राऊतांचा आक्रमक फोटो दिसत आहे.

सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई : लवकरच रो-रो मधून मालवाहतूक ; जेएनपीए रो-रो टर्मिनलचे काम पूर्ण

संबंधित बातम्या

धारावीचं टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळावं म्हणून सीमावाद पुढे आणला जातोय का? शरद पवार म्हणाले…
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश? सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, “कलम १४४ चे निर्देश…”
“दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“सत्यजित तांबेंना संधी द्या, नाहीतर…”, बाळासाहेब थोरातांसमोर देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी
अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन
राज्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस; महावितरण विभागाच्या मोहिमेला यश
४५ हजारांची लाच घेताना पैठण पंचायत समितीचे अधिकारी सापळ्यात
IND vs BAN 2nd ODI: गडी एकटा निघाला! हाताला पट्टी तरी रोहित टीम इंडियासाठी लढला, चाहत्यांचा कडक सॅल्यूट