scorecardresearch

मुंबई: कर्नाक उड्डाणपुलाचा नामोल्लेख असलेल्या सहा शिळा जतन करणार

कर्नाक उड्डाणपूल १८६८ मध्ये बांधण्यात आला होता. पुलाच्या दोन्ही टोकाला पुलाचे नाव आणि बांधकामाचे वर्ष कोरलेले बेसॉल्टच्या शिळा होत्या.

मुंबई: कर्नाक उड्डाणपुलाचा नामोल्लेख असलेल्या सहा शिळा जतन करणार
कर्नाक उड्डाणपुलाचा नामोल्लेख असलेल्या सहा शिळा जतन करणार

ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपुलाचे नाव कोरलेले सहा शिळा जतन करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक १८ जवळील पी. डी‘मेलो मार्गाच्या दिशेला असलेल्या पुरातन वारसा वास्तू गल्लीत या शिळा ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- मालेगाव बॉम्बस्फोट खटला: साध्वी प्रज्ञासिंहसह दोन आरोपींकडून दोषमुक्तीची याचिका मागे

सीएसएमटी आणि मशीद रोड रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल धोकादायक बनल्यामुळे नुकताच पाडण्यात आला. हा स्टीलचा उड्डाणपूल १८६८ मध्ये बांधण्यात आला होता. पुलाची लांबी ५० मीटर आणि रुंदी १८.८ मीटर इतकी होती. पुलाचे अंदाजे वजन ४५० टन इतके होते. पुलाच्या दोन्ही टोकाला पुलाचे नाव आणि बांधकामाचे वर्ष कोरलेले बेसॉल्टच्या शिळा होत्या. या शिळा पूल पाडल्यानंतर पुरातन वारसा वास्तू गल्लीत ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 17:33 IST

संबंधित बातम्या