मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १७ नोव्हेंबर रोजी कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय आता नगर विकास विभाग घेणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल नगर विकास विभागाकडे पाठवला असून अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.

शिवाजी महाराज पार्क मैदानात प्रचार सभा घेण्याच्या परवानगीकरीता मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे) या तिन्ही पक्षांनी अर्ज केले आहेत. निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता संपणार असून आदल्या दिवशी १७ नोव्हेंबर रोजी शेवटची प्रचार सभा राजकीय पक्षांना घेता येणार आहे. त्यामुळे या एका दिवसासाठी राजकीय पक्षांचे अर्ज आले असून तीनही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
sharad pawar narendra modi maharashtra cidhan sabha election 2024
Sharad Pawar vs Narendra Modi: शरद पवार व नरेंद्र मोदींची लग्नरास एकच; दोघांमध्ये फरक व साम्य काय? वाचा काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…
rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
All India Tribal Development Council urged not to vote for Nana Patole accusing betrayal
गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदान करू नका, आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा
Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी

हेही वाचा >>>मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात तिरंगी लढत; मुस्लिम मते ठरणार निर्णायक

विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मतदानाला काही दिवस उरले असून प्रचाराला वेग आला आहे आणि राजकीय वातावरणही तापले आहे. येत्या काही दिवसात मुंबईत राजकीय पक्षांतील मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे. सभांच्या आयोजनासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे गेल्याच महिन्यात अर्ज केले आहेत. मात्र १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी अद्याप निर्णय न झाल्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे या पक्षांनी पालिकेला पुन्हा स्मरणपत्रे पाठवली आहेत. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. ज्या पक्षांचे अर्ज आले आहेत त्यांच्या निवेदनासह परवानगीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला असून नगर विकास विभागच त्यावर निर्णय घेणार आहे. या परवानगीसाठी पहिला अर्ज मनसेने केल्याचा दावा या पक्षाने केला आहे. त्यामुळे आता नक्की कोणाला परवानगी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

हेही वाचा >>>उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? राऊतांनी सांगितलं कारण?

दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर सभा किंवा कार्यक्रम घेण्यासाठी मैदान आरक्षित करण्याकरीता सर्वोच्च न्यायालयाने ४५ दिवसांची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा संपल्याची चर्चा असून कोणालाही १७ नोव्हेंबरला मैदान देता येणार नसल्याची चर्चा आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांनी १०, १२ नोव्हेंबरसाठी मैदान आरक्षित केले होते, पण तेथे सभा झाली नाही. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी मैदान उपलब्ध होऊ शकणार असल्याचे समजते.

शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आणि प्रचार सभा…

१७ नोव्हेंबर हा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिनही आहे. त्यामुळे शिवसैनिकांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मैदानावर शिवसैनिकांची मोठी रिघ लागलेली असते. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांनीही अर्ज केले आहेत. त्यामुळे या दिवशी सभेसाठी मैदान मिळावे याकरीता तीनही पक्ष आग्रही आहेत.