डॉ. राजन वेळूकरांच्या पीएचडीची चौकशी करण्याची मागणी

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांना नागपूर विद्यापीठातर्फे देण्यात आलेली पीच.डी. अत्यंत ढिसाळ पद्धतीने दिल्याचा आरोप करत याबाबत चौकशी व्हावी,

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांना नागपूर विद्यापीठातर्फे देण्यात आलेली पीच.डी. अत्यंत ढिसाळ पद्धतीने दिल्याचा आरोप करत याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी मंगळवारी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. यासाठी या संघटनेने मुख्यमंत्री आणि कुलपती यांचे दार ठोठावले आहे.
नागपूर विद्यापीठाचे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. विलास तभाने यांनी आक्षेप घेऊन संबंधित गरप्रकार लिखित स्वरूपात परीक्षा नियंत्रक व कुलगुरूंच्या निदर्शनास आणूनदेखील वेळूकर यांना पीचडी प्रदान करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. किंबहुना म्हणूनच या पदवी प्रदानाची सखोल चौकशी करावी, अशी विनंती राष्ट्रवादीतर्फे कुलपती राज्यपाल के. शंकरनारायण आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The demand of inquiry dr rajan velukar ph d degree

ताज्या बातम्या