मुंबई : अणुशास्त्राचा वैद्यकशास्त्र आणि उपचारपद्धतीतील (न्यूक्लिअर मेडिसिन) वापराचे जनक पद्मभूषण डॉ. रामचंद्र दत्तात्रय लेले यांचे शनिवारी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेनंतर डॉ. लेले पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेले. ब्रिटनमधून १९५७ मध्ये ते परत भारतात आले. त्यानंतर ते नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले. या काळात त्यांनी वैद्यकीय संग्रहालय, मधुमेह दवाखाना सुरू केला. याच काळात त्यांनी कॅनडामधून ‘न्यूक्लिअर मेडिसिन’ या विषयात विशेष प्रशिक्षण मिळवले. जे.जे. रुग्णालयात अधिष्ठातापदी कार्यरत असताना ते ‘जसलोक संशोधन केंद्रा’मध्ये ‘न्यूक्लिअर मेडिसिन’ विभागाचे प्रमुख होते.

भाभा अणुसंधान केंद्र आणि जसलोक रुग्णालय यांच्या सहकार्याने १९७० मध्ये त्यांनी जसलोकमध्ये ‘न्यूक्लिअर मेडिसिन’ हा स्वतंत्र विभाग सुरू केला. असंसर्गजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला यांचे महत्त्व जाणवून दिले. यामुळेच पुढे असंसर्गजन्य आजार नियंत्रणाचा स्वतंत्र कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली.

loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
Scientist Parthasarathy Mukherjee
बायोगॅस प्रकल्पामधून आता शुद्ध पाणी; शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांचे संशोधन
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले

डॉ. लेले यांचे कार्य..

डॉ. लेले यांनी ९० व्या वर्षांत पदार्पण केले, त्या वेळी  २०१७ मध्ये त्यांचे ‘परस्युएट ऑफ एक्सलन्स’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले. डॉ. लेले यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय होतेच याशिवाय प्राध्यापक म्हणून त्यांचे या क्षेत्रात विशेष योगदान होते. वैद्यकीय क्षेत्रात १०० हून अधिक शोधनिबंध आणि ११ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन १९९२ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय आण्विक समाजाच्या वतीने दिला जाणारा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार, प्रा. एम.विश्वनाथ राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले होते. न्यूक्लिअर मेडिसिन म्हणजे अणुशक्तीचा वापर करून केलेले उपचार किंवा निदान. सध्या रेडिओथेरपी, सिटी स्कॅन, एमआरआय इत्यादी वैद्यकीय उपचार आणि निदान पद्धतीमध्ये अणुशक्तीचा वापर केला जातो.