मुंबई : ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’चे बिगूल वाजून आता प्रत्यक्षातली लगीनघाई सुरू झाली आहे. महाविद्याालयीन तरुणाईच्या लोकांकिका स्पर्धेतील सहभागासाठीच्या लगबगीने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण सध्या चैतन्यमय झाले आहे. लोकांकिकांच्या तालमींना जोर आला आहे. ही स्पर्धा युवकांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याबरोबरच त्यांची भविष्यातील कलाकीर्द ठरवण्याच्या वाटाही खुल्या करीत असल्याने कला क्षेत्रातील त्यांच्या भवितव्याची दिशाही त्यांना यातून सापडणार आहे. त्यांची ही रंगप्रतिभा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी क्षेत्रांतील ‘वलयांकित’ व्यक्तिमत्त्वांसमोर पेश करण्याची संधी त्यांना यानिमित्ताने लाभणार आहे. या तिन्ही कला क्षेत्रांतील ‘वलयांकित’ कलाकार, लेखक, दिग्दर्शक मंडळी ८ ते १४ डिसेंबरदरम्यान मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि नाशिक या आठ केंद्रांवरील विभागीय अंतिम फेरीला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, पॉवर्ड बाय पार्टनर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, टॅलेन्ट पार्टनर आयरिस प्रॉडक्शन आणि ‘अस्तित्व’ यांच्या सहकार्याने होत असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’ला त्यामुळे एक आगळेवेगळे ग्लॅमर प्राप्त होत आहे. ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’ हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत.

प्रायोगिक, समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीवरील निर्माते, अभिनेते तसेच आकाशवाणी, जाहिरात क्षेत्रांतील भारदस्त ‘आवाज’ म्हणून घराघरांत पोहोचलेले अजित भुरे, ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या स्नातक आणि रंगभूमी व अनेक सिनेमांतून अभिनेत्री म्हणून ठसा उमटविलेल्या अश्विनी गिरी, नाटय़-दिग्दर्शक व अभिनेते सुबोध पंडे, अनेक नाटके, चित्रपट आणि मालिकांतून सक्रिय असणारे विजय पटवर्धन, व्यावसायिक रंगभूमीवरील यशस्वी नाटककार अरिवद औंधे, राज्य नाटय़स्पर्धेतील अनेक गाजलेल्या नाटकांचे लेखन-दिग्दर्शन करणारे, नाटक, चित्रपट, मालिका आणि जाहिरातीतील सुपरिचित चेहरा असलेले विजय निकम, नाटय़लेखन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, नेपथ्य-प्रकाशयोजनाकार अशा बहुढंगी भूमिका अगदी लीलया पेलणारे प्रदीप वैद्य, ‘िरगण’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा तसेच ‘कागर’, ‘सोयरीक’ आदी सिनेमांचे दिग्दर्शक मकरंद माने, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ हे चित्रपट तसेच अनेक मालिका व वेबसीरिजमध्ये काम केलेले देवेंद्र गायकवाड, व्यावसायिक रंगभूमीवरील जवळजवळ ९० टक्के नाटकांना ज्यांची प्रकाशयोजना असतेच असते असे शीतल तळपदे हे दिग्गज मान्यवर लोकांकिकांच्या विभागीय अंतिम फेरीकरिता पाहुणे म्हणून लाभणार आहेत. त्यांच्याबरोबरच सध्या रंगभूमीवर धो-धो चाललेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या प्रशांत दामले यांच्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक आणि ‘दादा, एक गुड न्यूज आहे’सारख्या अनेक यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसारख्या अनेक मालिकांचे लेखक, अभिनेते म्हणून छाप पाडणारे अद्वैत दादरकर, सध्या व्यावसायिक रंगभूमी गाजवत असलेले ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ नाटकातील प्रमुख भूमिका तसेच अन्यही अनेक नाटके, ‘का रे दुरावा?’सारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांतून रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते सुयश टिळक हेही लोकांकिकांच्या विभागीय अंतिम फेरीला हजेरी लावणार आहेत. ‘बालक पालक’, ‘यलो’ यांसारखे आगळे चित्रपट आणि महाविद्याालयीन रंगभूमीवरून प्रसिद्धी पावलेले लेखक-दिग्दर्शक अंबर हडप आणि गणेश पंडित ही जोडगोळीही लोकांकिकांतील युवा प्रतिभेचे आविष्कार आस्वादण्याकरिता आवर्जून येणार आहेत.
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने घराघरांत पोहोचलेले दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि या मालिकांचे एक लेखक व विनोदी अभिनेते समीर चौघुले यांची लोकांकिका उपक्रमांतील उपस्थिती ही केवळ ते मालिकांतील चमकदार कलावंत म्हणून असणार नाहीए, तर त्यांनी महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक रंगभूमीवरही भरीव योगदान दिलेले आहे. ‘ऑल दी बेस्ट’ या गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ रंगभूमी गाजवणाऱ्या नाटकाने रसिकांपर्यंत पोहोचलेल्या अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना तसेच ‘किमयागार’, ‘संगीत मत्स्यगंधा’सारख्या नाटकांच्या दिग्दर्शिका, निवेदिका अशी दीर्घ कलाकीर्द असणाऱ्या संपदा जोगळेकर-कुलकर्णी याही या स्पर्धेकरिता पाहुण्या म्हणून येत आहेत.

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
Shekap Janyat Patil
VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका

अशा नामांकितांसमोर आपली सर्जनप्रतिभा सादर करण्याची संधी युवा रंगकर्मीना ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धे’तून लाभणार आहे. या दुर्मीळ सुवर्णयोगाचा लाभ उठवण्याची संधी ते व्यर्थ दवडणार नाहीत, हे निश्चित! चला तर..सज्ज व्हा!