राज्यातील पहिला ‘ओमायक्रोन’बाधित रूग्ण झाला करोनामुक्त!

पुढील सात दिवस त्याला घरगुती विलगिकरणात

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

कल्याण दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून २२ नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत आलेला ओमायक्रोन बाधित ३३ वर्षीय रुग्ण करोनामुक्त झाला आहे. आज त्याचा ओमायक्रोन आणि करोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यांनातर त्याला संध्याकाळी सहा वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता पुढील सात दिवस त्याला घरगुती विलगिकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. तर उर्वरित नायजेरियामधून आलेल्या त्या चार करोनाग्रस्त रुग्णाच्या जिनोम सिक्वेन्सिंग अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The first omicron infected patients in the state was cured from corona msr

ताज्या बातम्या