मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याला स्थगिती देण्याची प्रकरणातील मुख्य आरोपी ले. कर्नल प्रसाद पुरोहित याने केलेली मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसह मंजुरीशिवाय खटला चालवला जात असल्याला आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) आरोप ठेवण्याला पुरोहितने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अन्य आरोपींनीही विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका केल्या आहेत. न्यायमूर्ती प्रशांत वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी पुरोहितच्या याचिकांवर सुनावणी झाली. त्या वेळी खटल्याला स्थगिती देण्याची मागणी पुरोहितचे वकील एम. आर. व्यंकटेशन यांनी केली; परंतु स्थगिती कशासाठी मागितली जात आहे हे व्यंकटेशन यांनी स्पष्ट करण्यापूर्वीच न्यायमूर्ती प्रशांत वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने त्याला रोखले. तसेच खटल्यात बरेच साक्षीदार तपासण्यात आले आहेत. खटला मध्यावर आहे.