मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांचे गेले आठ दिवस सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. होमिओपॅथीसंबंधी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, जीवनावश्यक औषधे देण्याची परवानगी असावी, ‘ड्रग अ‍ॅण्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्ट’मध्ये होमिओपॅथीचा समावेश करावा़  तसेच होमिओपॅथीसाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करावी, आदी मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या होत्या. ‘महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समिती’चे राज्य समन्वयक डॉ. विजय पवार आठवडाभर उपोषणाला बसले होते. तरीही मागण्यांकडे लक्ष दिले गेले नसल्याने सोमवारी मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच सकाळी मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावले. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याने संघटनेने आंदोलन मागे घेतले.