मुंबई : मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात भाजपचे ‘संकटमोचक’ अशी प्रतिमा तयार झालेले गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, दादा भूसे आदी मंत्र्यांचे पंख छाटले गेले आहेत. भाजप व राष्ट्रवादीने नवीन चेहऱ्यांकडे महत्त्वाची खाती सोपवून नवीन नेतृत्व पुढे आणण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.

गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास विश्वासू मानले जातात. कोणताही राजकीय पेच वा तिढा निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी महाजन हे धावून जातात. अगदी अलीकडे मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे अडून बसले असता महाजन यांनीच त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढली होती. यामुळेच महाजन यांना संकटमोचकाची उपमा दिली जाते. मावळत्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन अशी महत्त्वाची खाती भूषविली होती. त्याआधी फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा हे खाते होते. नवीन सरकारमध्ये महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ, तापी आणि कोकण महामंडळे हे विभाग व आपत्ती व्यवस्थापन ही खाती सोपविण्यात आली आहेत. आधीच्या खात्यांच्या तुलनेत महाजन यांचे पंख छाटले गेले आहेत. जलसंपदा खाते असले तरी हे खाते पूर्णपणे त्यांच्याकडे नाही. आपत्ती व्यवस्थापन ही खातेही फारसे महत्त्वाचे मानले जात नाही. महाजन यांच्या मंत्रिमंडळात समावेशावरून बराच खल झाला होता. पण फडणवीस यांनी महाजन यांच्या नावाचा आग्रह धरल्याची चर्चा होती. आधीच्या तुलनेत महाजन यांच्याकडे कमी महत्त्वाची खाती सोपवून त्यांचे महत्त्व कमी करण्यात आले आहे.

Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Vacant posts of police officers in the maharashtra state
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त; कायदा व सुव्यवस्था धोक्यात : तपासावरही परिणाम
Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : रेल्वे आता सेवा नव्हे उद्योग
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हेही वाचा >>>दहिसरच्या राडारोडा प्रकल्पाला रहिवाशांचा विरोध, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पाटेकर पतीपत्नी यांनी प्रकल्पाच्या स्थळी येऊन विरोध दर्शवला

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागील सरकारमध्ये महसूल हे महत्त्वाचे खाते होते. काँग्रेस सरकारमध्ये विखे-पाटील यांनी कृषी, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती भूषविली होती. नवीन मंत्रिमंडळात जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे हे दोनच विभाग सोपविण्यात आले आहेत. महाजन व विखे-पाटील यांच्यात जलसंपदा खात्याची विभागणी झाली आहे. एकूणच महाजन यांच्याप्रमाणेच विखे-पाटील यांचेही पंख छाटण्यात आले आहेत.

बीडमधील सरपंचाच्या हत्येवरून सध्या वादात सापडलेले धनंजय मुंडे यांनाही अजित पवारांनी मोठा धक्का दिला आहे. कारण मागील सरकारमध्ये मुंडे यांच्याकडे कृषी हे अत्यंत महत्त्वाचे खाते होते. नवीन सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते सोपविण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय फटका आहे. मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशास विरोध झाला होता. धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच त्यांची चुलत भगिनी पंकजा मुंडे यांच्याकडेही पर्यावरण व पशूसंवर्धन ही तुलनेत कमी महत्त्वाची खाती सोपविण्यात आली आहेत.

घाटकोपरमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात सोसायटीवर गुन्हा

भुसेंकडे डोकेदुखी वाढविणारे खाते

शिवसेनेचे दादा भूसे यांनी आधी कृषी, रस्ते विकास अशी खाती भूषविली होती. यंदा त्यांच्याकडे शालेय शिक्षण हे डोकेदुखी ठरणारे खाते आले आहे.

नवीन चेहऱ्यांना महत्त्वाचे विभाग

भाजपने मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेल्या शिवेंद्रनराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे (ग्रामविकास), राष्ट्रवादीने माणिकराव कोकाटे (कृषी), बाबासाहेब पाटील (सहकार), मकरंद पाटील (मदत पुनर्वसन) अशी महत्त्वाची खाती सोपवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा फोल

चांगले खाते मिळावे अशी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची अपेक्षा होती. पण उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य हा जुन्याच खात्यांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. फडणवीस सरकारमध्ये पाटील यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकारसारखी महत्त्वाची खाती भूषविली होती.

Story img Loader