मुंबईसह ठाणे आणि आसपासच्या परिसरात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता. मात्र दुपारनंतर मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली. परंतु ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या भागात पावसाचे धारानृत्य सुरूच आहे.कल्याण, डोंबिवली, ठाण्यात गुरुवारी दुपारी १ वाजेपासून ते शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत १२० मिमी पेक्षा जास्त पावसाची, तर मुंब्र्यात सर्वाधिक १५९ मिमी पावसाची नोंद झाली.पावसाने गुरुवारी रात्रीपासून मुंबई, ठाण्याला झोडपण्यास सुरुवात केली. शुक्रवारी दुपारनंतरही ठाण्यात पावसाचा मुक्काम कायम होता. त्यामुळे ठाण्यातील सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. नदी काठची घरे जलमय होण्यास सुरुवात झाली असून सर्वत्र भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : सोन्याच्या तस्करीप्रकरणी विमानतळावरून एकाला अटक

jalgaon and jamner heavy rain
जळगावला तुरळक; जामनेरमध्ये जोरदार पाऊस, मका, केळी, ज्वारी पिकांचे नुकसान
kolapur crime news, kolhapur murder marathi news
कोल्हापुरात सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
Two people have died
मुंबई : खाणीतील पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
summer heat pune marathi news, pune summer marathi news
पुण्यात वाढल्या उन्हाच्या झळा

कोकणातील अनेक भागात गुरुवारपासून पावसाची संततधार सुरू असून शुक्रवारी दमदार पाऊस सुरूच होता. उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून अरबी समुद्रापासून उत्तर प्रदेशाच्या मध्यवर्ती भागापर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची गती वाढली आहे. परिणामी, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी अशीच परिस्थिती कायम राहणार आहे. अरबी समुद्रापासून मध्य आणि पूर्व भारताच्या दिशेने वारे वाहत आहेत. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.