मुंंबई : मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठीच्या कामाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रविवारी संध्याकाळी याबाबत चर्चा करण्यासाठी नागरिकांची बैठक पार पडली मात्र त्यात कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. जलाशयाच्या कामासाठी हँगिंग गार्डनमधील झाडांचा बळी जाईल, मलबार हिल परिसरात आरेची पुनरावृत्ती होईल, अशी भीती तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी ३८९ झाडे कापावी किंवा पुनर्रोपित करावी लागणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी या कामाला विरोध केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले होते. त्यानुसार रहिवासी आणि पर्यावरणवादी यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या संपूर्ण विषयावर चर्चा करून पर्यायी मार्ग सुचवण्याबाबत विचार विनिमय करणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास न होता हे काम कसे पूर्ण करता येईल, यावर ही समिती विचार करेल. या समितीची बैठक रविवारी संध्याकाळी झाली. या बैठकीत नागरिकांनी आपापली मते मांडली मात्र त्यातून ठोस तोडगा अद्याप निघाला नाही.

Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Bhau Daji Lad Museum, Devendra Fadnavis, Renovation ,
आक्रमणे आणि अनास्थेमुळे भारताच्या ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास – देवेंद्र फडणवीस, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे नूतनीकरण
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
tiger path blocked loksatta news
नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…
Local villagers experienced thrill fight between two tigers in Wasada Makta area
‘त्या’ दोन वाघांमध्ये झुंजीचा थरार; रक्ताचा सडा, पण…
nagpur municipal corporation launched ambitious plan to waive 80 percent of late fees on water tax bills
नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट, महापालिकेकडून ‘या’ महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात

हेही वाचा – मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणाची हत्या

मलबार हिल सिटीझन फोरमच्या सुशिबेन शाह म्हणाल्या की, या प्रकल्पाला राज्य सरकार स्थगिती देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. पालकमंत्री लोढा यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून कामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. पण ते स्वतः मंत्री आहेत, तुमचे सरकार आहे मग तुम्ही थेट स्थगिती का देत नाहीत, असा सवाल शाह यांनी केला आहे. नुसते जलाशय बांधून होणार नाही तर त्यासाठी पंपिंगची जागा, जलवाहिन्या अशी सगळी यंत्रणा उभारावी लागेल मग किती जागा लागेल याची पालिका यंत्रणेलाच माहिती आहे. त्यामुळे पर्यायी जागा शोधण्याची जबाबदारी नागरिकांवर टाकण्यापेक्षा पालिकेनेच दुसरी जागा शोधावी व तोपर्यंत प्रकल्प पुढे नेऊ नये, अशीही मागणी त्यांनी केली आहे. सध्या नगरसेवकांची मुदत संपलेली आहे त्यामुळे नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अशी मागणीही शाह यांनी केली आहे.

हेही वाचा – पनवेल येथे पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा वाहतूक ब्लॉक

आरेमध्ये जशी रातोरात झाडे कापली तशी पुनरावृत्ती इथे होईल अशी भीती आम्हा नागरिकांना वाटते आहे. संभ्रम निर्माण करायचा, लोकांना गोंधळात टाकायचे आणि भीतीची टांगती तलवार नागरिकांवर ठेवायची अशी ही नीती असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.

Story img Loader