“भाजपाला जितक्या वेळा पराभूत करणार तितक्या वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार”

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला आहे.

modi shah

नवी दिल्ली : इंधनदराच्या भडक्यामुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने बुधवारी काही प्रमाणात दिलासा दिला. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून, ती आज गुरुवारपासून लागू झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर मंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधलाय. भाजपाला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल – डिझेलचा भाव कमी होत राहणार. ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे मंगळवारी निकाल जाहीर झाले. हिमाचल प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तर निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी दरात कपात करण्यात आल्याने विरोधक भाजपावर निवडणूक हरल्यामुळे दरात कपात केल्याची टीका करत आहेत.

“केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करताना पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी कमी केला तर डिझेलचा भाव १० रुपयांनी कमी केला. यामुळे केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर जी लूट केली जात होती ती काही प्रमाणात कमी झाली आहे,” असं ते म्हणाले.

दरम्यान जनतेला केंद्रसरकारची ही दिवाळी गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. परंतु ही दिवाळी गिफ्ट नाही या देशात ‘भाजप हराओ दाम घटाओ’ असे आंदोलन सुरू करण्यात आल्यावर हे भाव कमी झाले आहेत,” असं नवाब मलिक म्हणाले.

केंद्राने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले. काही तासांनंतर, उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलवरील व्हॅट सात रुपये आणि डिझेलवर दोन रुपयांनी कमी करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही इंधनांच्या किमती येथे प्रतिलिटर १२-१२ रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यानंतर, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा आणि आसामच्या सरकारांनी दोन्ही इंधनांनच्या करात आणखी कपात केली. या राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी सात रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे डिझेलच्या दरात प्रति लिटर १७ रुपये आणि पेट्रोलच्या दरात १२ रुपयांनी कपात होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The more times we defeat bjp price of petrol and diesel will be reduced more says nawab malik hrc

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या