मुंबईतील विलेपार्ले जुहू रोड, इंदिरा नगर येथील नाल्यालगतची जमीन रविवारी रात्रीच्या सुमारास खचल्याने ७ झोपड्यांची पडझड झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दुर्घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी पालिकेचे पथक आज (सोमवारी) घटनास्थळाची पाहणी करणार आहे. दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून आसपासच्या १७० झोपड्यांमधील रहिवाशांना पालिकेच्या शाळांमध्ये हलवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मुंबई : विलेपार्ले येथे नाल्यामध्ये सात झोपड्या खचल्या

१७० नागरिकांचे स्थलांतर

मिठीबाई महाविद्यालयाजवळ असणाऱ्या नाल्यात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सात झोपड्या खचल्या. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, रविवारी दुपारीच एका घराला तडा गेला होता त्याचवेळी काही रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले होते असे समजते. दुर्घटनेनंतर सुमारे १७० झोपड्यांमधील रहिवाशांना संन्यास आश्रम पालिका शाळा व टाटा कम्पाऊंड पालिका शाळा या दोन शाळांमध्ये तसेच विलेपार्ले जैन श्रावक संघ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

हेही वाचा- सरकारमुळेच लाखो बालके कुषोषणाच्या विळख्यात! आठ रुपयात पोषण आहार देण्याचे सरकारला आव्हान

पालिकेकडून घटनास्थळाची पाहाणी

दरम्यान, सोमवारी घटनास्थळाची पाहणी करण्यात येणार असून त्यानंतर उपाययोजना आणि पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The municipal corporation will inspect place of seven huts were washed away in the drain at vile parle mumbai print news dpj
First published on: 26-09-2022 at 11:01 IST