मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचा कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने राज्य काँग्रेससाठी आता नवीन प्रभारी नेमावा लागणार आहे. काँग्रेसमध्ये शक्यतो एक व्यक्ती, एक पदाचे सूत्र अमलात आणले जाते. कर्नाटक काँग्रेसमध्ये पाटील हे ज्येष्ठ नेते असले तरी काँग्रेसच्या राष्ट्रीय संघटनेत तसे ते अननुभवी होते.

काँग्रेसमध्ये महाराष्ट्राची जबाबदारी आतापर्यंत केंद्रातील ज्येष्ठ नेत्याकडे सोपविली जात असे. त्यात जी. के. मूपनार, माधवराव शिंदे, वायलर रवी, मार्गारेट अल्वा, मल्लिकार्जुन खरगे आदींचा समावेश होता. या तुलनेत एच. के. पाटील नवखे होते. तरीही त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कर्नाटकबाहेर त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याचा अनुभवही नव्हता. तरीही गेली दोन वर्षे त्यांनी राज्याचे प्रभारी म्हणून राज्य काँग्रेसमधील गटबाजी रोखण्यावर भर दिला होता.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Nagpur Lok Sabha, Nitin Gadkari,
गडकरी हॅटट्रिक साधणार ?
Nirmala Sitharaman
कर्नाटकात घराणेशाही काँग्रेससाठी अडचणीची? आठ मंत्र्यांची मुले रिंगणात
Sangli Lok Sabha candidacy Congress workers focus on Delhi decision
सांगली लोकसभा उमेदवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष दिल्लीच्या निर्णयाकडे

एच. के. पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्राची जबाबदारी लवकरच काढून घेतली जाईल. पाटील यांच्या जागी राज्य काँग्रेससाठी नवा प्रभारी नेमावा लागेल. मल्लिकार्जुन खरगे व एच. के. पाटील हे दोघेही लागोपाठ नेमलेले प्रभारी कर्नाटकमधील होते. राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जागावाटपाच्या वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. यामुळे एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे प्रभारीपद सोपविले जाऊ शकते.