शहरबात : रेश्मा राईकवार

गेल्या वर्षी मार्च महिन्यात टाळेबंदीमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुरू असणाऱ्या चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणावर बंदी आली. मनोरंजनाचा दूरचित्रवाणीवर सुरू असलेला रतीब अचानक बंद झाला. जुन्या मालिका पाहून प्रेक्षक कं टाळले, हजारोंचा रोजगार बुडाला. आणि किमान चित्रीकरणावरचे र्निबध उठवा, अशी मागणी होऊ लागली. तीन महिन्यांनंतर चित्रीकरणाला परवानगी मिळाली मात्र, मार्चपासून लागू झालेल्या नव्या र्निबधांमुळे पुन्हा या उद्योगाला झळ लागली. मुंबईची ओळख असलेले हे मनोरंजन विश्व कोणी इथून उचलून बाहेरगावी न्यावे अशा पद्धतीने बाहेरच्या राज्यात जाऊन चित्रिकरण करते झाले. मात्र इतक्या घडामोडी घडूनही मनोरंजन उद्योग हा या शहराचा नुसता चेहरा नाही, तर ताकद आहे याकडे अजूनही सरकारचे दुर्लक्षच होते आहे..

मनोरंजन उद्योगाची पाळेमुळे मुंबईतच रुजली आहेत. मनोरंजन म्हणजे के वळ चित्रपट हे समीकरण कधीच मागे पडले आहे. हिंदी आणि प्रादेशिक भाषेतील मनोरंजन वाहिन्यांनी घराघरातून इतक्या यशस्वी पद्धतीने आपले बस्तान बसवले आहे की त्याची एक स्वतंत्र उद्योग म्हणून दखल घेता येईल. गेली अनेक वर्ष मुंबई आणि आसपासच्या परिसरात चित्रपट आणि मालिकांची चित्रीकरणे नित्यनेमाने सुरू आहेत. त्यातल्या त्यात चित्रपटांनी चित्रिकरणासाठी कधीच राज्य आणि देशाबाहेर सीमोल्लंघन के ले असले तरी मालिका विश्व हे प्रामुख्याने मुंबईतच स्थिरावलेले आहे. कधीकाळी मढ-मार्वे-मालवणी अशा कु ठल्यातरी लांबच्या ठिकाणी मालिकांचे सेट लागलेले असत, मात्र हिंदीबरोबरच मराठी वाहिन्यांची संख्या वाढत गेली तसतशी मालिकांच्या निर्मितीची गणितेही बदलत गेली. आज मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, चांदिवली इथपासून ते नायगाव, मीरा भाईंदर, ठाणे घोडबंदर रोड अशा कित्येक उपनगरांना मालिकांच्या सेट्सचा वेढा पडला आहे.

मुंबई आणि परिसरात सध्या एकाचवेळी १४३ मालिकांचे चित्रीकरण दररोज सुरू असते. याची ठळकपणे निर्माते आणि संघटनांनाही जाणीव झाली ती करोनाच्या र्निबधातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या निमित्ताने. मुंबईत स्टुडिओ आणि सेट्सची झालेली ही अर्निबध वाढ सरकारला नियंत्रित पद्धतीने करता आली असती. पण तसे झाले नाही. १९७७ साली मुंबईत चित्रीकरणासाठी अद्ययावत अशी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके  चित्रनगरी उभी राहिली. राज्य सरकारच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या या चित्रनगरीचा उद्देश हा प्रामुख्याने चित्रपट आणि जाहिरात यांच्या चित्रीकरणासाठी होता. २ ऑक्टोबर १९७२ ला दूरदर्शन मुंबई के ंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली, मात्र दूरदर्शनच्या कार्यक्रमांसाठी याच के ंद्राच्या वरळीतील जागेत अद्ययावत स्टुडिओ उभारले गेले होते. दरम्यानच्या काळात मुंबईत चित्रपटनिर्मितीचा व्याप वाढत गेल्याने चेंबूर, अंधेरी, वांद्रे परिसरात आर. के . स्टुडिओ, कमालिस्तान स्टुडिओ, मेहबूब स्टुडिओ, फिल्मिस्तान, चांदिवली स्टुडिओ असे कितीतरी स्टुडिओ उभे राहिले. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लागणारे रुग्णालय, मंदिर, गाव असे सेट्स उभारण्याच्या दृष्टीने या स्टुडिओची रचना करण्यात आली होती. मोठय़ा प्रमाणावर चित्रपटांचे चित्रीकरण करणारे हे स्टुडिओ कालांतराने खासगी वाहिन्यांची लाट आल्यानंतर मालिकांच्या चित्रीकरणासाठी वापरले जाऊ लागले.

१९९२ साली झी टीव्ही या पहिल्या खासगी वाहिनीची सुरुवात झाली. खासगी वाहिन्या आल्यानंतर बाहेरून मालिकांची निर्मिती करून घेण्याचा प्रघात रूढ झाला. वाहिन्यांची संख्या वाढली परिणामी मालिकानिर्मितीचाही आकडा वाढत गेला. तोवर चित्रपट आणि दूरदर्शन वाहिन्यांपुरतेच मर्यादित असलेल्या जाहिरातदारांना खासगी वाहिन्यांच्या माध्यमातून मोठा प्रेक्षकवर्ग खुणावता झाला. या वाढत्या अर्थव्यवस्थेतून मग वाहिन्या, मालिका, कलाकार, सेट्स, तंत्रज्ञ, कामगार हे एक मोठे अर्थचक्र वाढतच गेले. हा सगळा विकास मनोरंजन वाहिन्यांनी स्वत:च्या बळावर घडवून आणला. हिंदी वाहिन्यांना स्पर्धेत टिकू न राहण्यासाठी देशभरातीला प्रेक्षकवर्ग लक्षात घेत मोठमोठय़ा हवेलीचे सेट्स असलेल्या मालिकांची निर्मिती गरजेची भासू लागली. स्टुडिओत चित्रीकरणापेक्षा मढ, मार्वे, मालवणी भागात अनेक शेतजमिनी पडून असल्याचे लक्षात आले. या शेतजमिनींवरून जमीनमालकांचे आपापसात वाद होते. शेतजमिनींच्या जागा नुसत्या पडून राहण्यापेक्षा अमुक वर्षांसाठी भाडय़ाने द्या, असा प्रस्ताव निर्मात्यांकडून त्यांच्यासमोर ठेवला गेला. शेतीतून येणाऱ्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न जास्त असल्याने जमीन मालकही यासाठी तयार झाले. अशा पद्धतीने जागा भाडय़ाने घेऊन तिथे बंगले बांधून मालिकांच्या चित्रीकरणासाठी ते वापरले जाऊ लागले. १९९९ मध्ये आता झी मराठी नावाने ओळखली जाणारी ‘अल्फा मराठी’ ही खासगी मराठी वाहिनी आली आणि मग खासगी मराठी वाहिन्यांचे प्रस्थही वाढत गेले. २००० मध्ये के बीसीसारखा रिअ‍ॅलिटी शो आला. या शोसाठी पुन्हा भव्य सेट्स गरजेचे झाले. मग हे शोज पुन्हा फे मस, फ्युचर अशा स्टुडिओकडे वळले. दूरचित्रवाहिन्यांचा हा पसारा एवढा वाढत चालला आहे की मुंबई शहराबरोबरच उपनगरांनाही मालिकांच्या सेट्सने आपल्या क वेत घेतले आहे.

मुंबई शहराची वाहतुकीची समस्या लक्षात घेत काही मराठी निर्मात्यांनी ठाण्यातील बंद पडलेल्या कं पन्यांच्या जागा हेरून तिथे मालिकांचे सेट्स उभारण्यास सुरुवात के ली. सध्या ठाण्यात घोडबंदर रोडचा पूर्ण परिसर, मीरा-भाईंदर, जोगेश्वरी, कांदिवली, गोरेगाव, नायगाव ते पुढे वापी, उंबरगाव असा गुजरातच्या सीमेपर्यंतच्या परिसरात विविध ठिकाणी मालिकांचे सेट्स उभे आहेत. अनेक मराठी मालिकांनी आता मुंबईबाहेर सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी चित्रीकरण व्यवस्था उभी के ली आहे. खरे तर महाराष्ट्रातील साखर कारखाने, इथली शिक्षण व्यवस्था, मुंबईतील आर्थिक के ंद्र ही जशी ओळख आहे, तसाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर विस्तारलेला मनोरंजन उद्योग ही या शहराची ताकद आहे. मात्र त्याकडे राज्यकर्त्यांचे कायम दुर्लक्ष होत राहिले आहे, या उद्योगातून मिळणारे उत्पन्न लक्षात घेत त्यासाठी चित्रनगरीच्या पलीकडे जाऊन  पायाभूत सोयीसुविधा निर्माण होणे गरजेचे आहे, असे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात.

२००० साली मराठी वाहिन्यांनी सुरुवात के ली तेव्हा त्यांची उलाढाल ७० कोटी रुपयांच्या आसपास होती, आता हीच उलाढाल ८०० कोटींच्या घरात आहे. जाहिराती, जागेचे भाडे, इतर सामग्री यातून मिळणारे उत्पन्न मोठे आहे. ही आर्थिक उलाढाल लक्षात घेऊन सरकारने या क्षेत्रासाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण के ल्या नाहीत तर आता तात्पुरत्या काळासाठी बाहेर गेलेला उद्योग कायमचा बाहेर जाण्याचा धोका आहे, अशी भीती या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.