मुंबई : मुंबई महानगरपालिके तील नगरसेवकांच्या संख्येत नऊने वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे मुंबईतील नगरसेवकांची संख्या २३६ होणार आहे.

महापालिका-नगरपालिकांमधील नगरसेवकांची संख्या ही सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर निश्चिात करण्यात आलेली आहे. करोनामुळे २०२१ च्या जनगणनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. आणखी काही काळ तरी ते सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत लोकसंख्यावाढीचा सरासरी वेग गृहीत धरून महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत सरासरी १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी सरकारने घेतला होता. त्यावेळी मुंबई महापालिकेतील सदस्यसंख्येत कोणतीही वाढ न करण्याची भू्मिका नगरविकास विभागाने घेतली होती. मात्र, मुंबई आणि राज्यातील अन्य महापालिकांबाबत भेदभाव के ल्यास सदस्यवाढीचा निर्णय न्यायालयाच्या कचाट्यात सापडू शकतो, त्यामुळे निवडणुकाही अडचणीत येण्याची शक्यता असल्याची बाब नगरविकास विभागाच्या निदर्शनास आणण्यात आली. त्यानंतर मुंबई महापालिकेतील सदस्य वाढविण्याचा निर्णय झाला.

मुंबई महानगरपालिकेत सन २००१च्या जनगणनेनुसार सध्या २२७ नगरसेवक आहेत. पालिके त सन २०११ च्या जनगणनेनंतर नगरसेवकांच्या संख्येत बदल करण्यात आला नव्हता. सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण लक्षात घेऊन नऊ सदस्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात असून, त्यानुसार पालिके तील सदस्यांची संख्या २३६ होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पालिके ने आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगास सादर के ला होता. मात्र, आता सदस्यवाढीमुळे पुन्हा प्रभागरचना करावी लागणार आहे.

मुंबई शहरातील लोकसंख्या कमी होऊन उपनगरांत लोकसंख्या वाढली आहे. नवीन निर्णयाने उपनगरातील नगरसेवकांच्या संख्येत वाढ होईल. उपनगरात शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची चुरस होणार आहे. नगरसेवकांच्या वाढीचा फायदा कोणत्या पक्षाला होतो, याची उत्सुकता असेल.