छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आता थेट न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. कोश्यारींविरोधात महाभियोग चालवण्यात यावा अशी मागणी याचिकाकार्त्याने केली आहे. या याचिकेमध्ये राज्यपालांनी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होईल अशी विधान केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> “शिवाजी महाराज जुने, तर गडकरी नवे आदर्श”, राज्यपालांच्या वक्तव्यावर गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “वेळ पडली तर आपल्या…”

कोश्यारी यांच्यावर माहभियोगाची कारवाई करण्यात यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. दीपक जगदेव यांनी कोश्यारींविरोधीत ही याचिका दाखल केली आहे. भारतीय राज्यघटनेनुसार, उच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करावी आणि अनुच्छेद ६१ आणि १५६ अन्वये राज्यपालांना हटवण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्य विधानमंडलाच्या अध्यक्षांना घ्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले यांचा अवमान करून महाराष्ट्रात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी चिथावणी देणाऱ्या राज्यपालांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. वकील नितीन सातपुतेंच्या माध्यमातून जगदेव यांनी ही याचिका दाखल केली आहे.

नक्की वाचा >> राज्यपाल कोश्यारींच्या गच्छंतीची शक्यता? दिल्लीकडून आलं बोलावणं; उद्या करणार दिल्लीचा दौरा, अमित शाहांना भेटणार?

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमधून राज्यपाल कोश्यारी देशातील शांतता, सुरक्षा आणि एकतेला बाधा ठरत असल्याचं या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सिद्ध झालं तर त्याच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात यावा. ते कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात तर कधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त विधानं करतात. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी जगदेव यांनी केली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरू आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांसह अन्य नेत्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोश्यारी यांना राज्यपालपदावरुन हटवावे, अशी मागणी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The public interest litigation pil against maharashtra governor bhagat singh koshyari in mumbai high court scsg
First published on: 23-11-2022 at 11:18 IST