scorecardresearch

मुंबई: थेट न्यायालयाच्या आवारातूनच सहा मोबाइलची चोरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार

अंधेरी न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहातून सहा मोबाइल चोरल्याप्रकरणी एका आरोपीला अंधेरी पोलिसांनी अटक केली.

मुंबई: थेट न्यायालयाच्या आवारातूनच सहा मोबाइलची चोरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई: अंधेरी न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहातून सहा मोबाइल चोरल्याप्रकरणी एका आरोपीला अंधेरी पोलिसांनी अटक केली. सोहेब शेख असे या आरोपीचे नाव असून त्याने चोरलेले मोबाइल लवकरच  हस्तगत करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.पण हा संपूर्ण प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे काही तासांतच पोलिसांनी आरोपीला पकडले.

हेही वाचा >>> मुंबईः क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

थेट न्यायालयाच्या आवारातूनच सहा मोबाइलची चोरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार

अंधेरी न्यायालयाच्या आवारात एक उपहारगृह असून रवी पुजारी या उपहारगृहाचे चालक आहेत. त्यांचे कर्मचारी दिवसा उपहारगृहात काम करून रात्री उशिरा तेथेच झोपतात. त्यांच्या उपहारगृहात २५ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा एक तरुण घुसला होता. त्याने झोपलेल्या कर्मचाऱ्यांचे सहा मोबाइल घेऊन पलायन केले. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर दोन दिवसांनी अंधेरी पोलिसांनी मोबाइल चोरीचा गुन्हा नोंदविला होता. हा संपूर्ण प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. त्यामुळे आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी मंगळवारी त्याला अंधेरी येथून अटक केली. सोहेब असे या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याला यापूर्वीही अंधेरी पोलिसांनी अटक केली होती. त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली आहे. त्यापैकी काही मोबाइल त्याने विकले आहेत. लवकरच हे मोबाइल संबंधितांकडून हस्तगत करण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 12:12 IST

संबंधित बातम्या