मुंबई: जल, जंगल आणि जमीन हक्कासाठी आदिवासी रस्त्यावर; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार | The tribals of Aare colony will take out a march to present their problems before the government mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबई: जल, जंगल आणि जमीन हक्कासाठी आदिवासी रस्त्यावर; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

आरे कॉलनीतील २७ पाड्यातील आदिवासी बांधवांसह मुंबईतील आदिवासी सोमवारी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

aarey-carshed
(संग्रहित छायाचित्र)

आरे कॉलनीतील २७ पाड्यातील आदिवासी बांधवांसह मुंबईतील आदिवासी सोमवारी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. जल, जंगल आणि जमीन वाचविण्यासाठी तसेच आदिवसासीयांना भेडसावणाऱ्या समस्या सरकारसमोर मांडण्यासाठी आदिवासींनी मोर्चाची हाक दिली आहे. त्यानुसार उद्या दुपारी ११ वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आदिवासी धडकणार आहेत.

हेही वाचा >>>राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”

आरेसह मुंबईतील इतर पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींचा मुख्य व्यवसाय शेती आहे. असे असताना विविध प्रकल्पासाठी त्यांच्या शेत जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. आरे कारशेड हे त्याचे उदाहरण. त्यांची घरे झोपडपट्टी घोषित करून त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी सरकारच्या कोणत्या योजनांचा लाभ घेताना आवश्यक ती प्रमाणपत्रे नसल्याने वा आवश्यक ती प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने आदिवासी हैराण झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपला आवाज सरकारपर्यंत आदिवासींनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>>देशाच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम नाही! अदानींच्या ‘एफपीओ’ माघारीबाबत सीतारामन यांचे मत

श्रमिक मुक्ती आंदोलन आणि महाराष्ट्र आदी आदिवासी मंच यांच्या माध्यमातून मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. उद्या, सोमवारी दुपारी ११ वाजता वांद्रे, उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासीयांचा मोर्चा धडकणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 13:11 IST
Next Story
राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”