मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात काहिशी एकतर्फी निवडणूक होत असली तरी उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारासाठी मेहेनत घेतली आहे. मात्र, तेथील राजकीय घडामोडींनंतर उमेदवाराच्या प्रचारापेक्षा निवडणूक होणार आहे… याच बाबीचा प्रचार उमेदवारांना प्राधान्याने करावा लागला आहे.

हेही वाचा… धारावी पुनर्विकासासाठी फक्त एकच निविदा ?

ubt shiv sena leader jyoti thackeray in yavatmal washim constituency tour
मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…
akola lok sabha marathi news
लोकसभेच्या प्रचारात विधानसभेच्या इच्छुकांची धडपड
Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
Wardha Lok Sabha, Ramdas Tadas, Amar Kale,
वर्धा : नात्याचा ताण अन निवडणुकीत निघतोय घाम! जावई – सासरा, सासरा – सून, मामा – भाचा असे…

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवत आहेत. भाजपने निवडणुकीतून माघार घेतली तरी इतर सहा अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने गुरूवारी (३ नव्हेंबर) पोट निवडणूक होणार आहे. निवडणूक काहिशी एकतर्फीच असल्यामुळे मतदारसंघात तुलनेने संथगतीने प्रचार झाला. मात्र, नवे चिन्ह, नवे नाव आणि भविष्यातील निवडणुकीसाठी मतदारांची मोट बांधण्याची संधी साधून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचार केला. मोठ्या सभा, समारंभांपेक्षा मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेण्याकडे आणि पदयात्रा काढण्याकडे लटके यांचा कल होता. प्रचाराची अजून काही तासांनी सांगता होणार आहे. मात्र गेले काही दिवस कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान उमेदवाराची ओळख करून देण्याबरोबरच मुळात निवडणूक होणार आहे याची आठवण मतदारांना करून द्यावी लागत होती.

हेही वाचा… अंधेरी पोटनिवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस

लटकेंच्या विरोधात अपक्ष कोण?

अंधेरी पूर्व निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्यासह बाला नाडर(आपकी अपनी पार्टी), मनोजकुमार नायक(राईट टू रीकॉल पार्टी), नीना खेडेकर(अपक्ष), फरहान सय्यद(अपक्ष), मिलिंद कांबळे(अपक्ष), राजेश त्रिपाठी(अपक्ष) हे सहा उमेदवार रिंगणात आहेत. लटकेंसोबत अपक्ष उमेदवार नीना खेडेकर आणि आपकी अपनी पार्टीचे उमेदवार बाला नाडर हे दोन उमेदवार तुलनेने अधिक सक्रीय आहेत. या निवडणुकीसाठी सामान्य लोकांना पाणी मिळावे, रस्त्यांचे काम सुरळीत व्हावे, झोपटपट्टी पुनर्वसनाची रखडलेली काम मार्गी लागावी अशी अपक्ष उमेदवार नीना खेडेकर यांची उदिष्टे आहेत. नाडर यांनी डिजिटलायझेशन या मुद्यावर भर दिला आहे. तसेच राजेश त्रिपाठी हे उत्तर भारतीयांच्या मुद्यावर लढत आहेत.

हेही वाचा… मुंबई ट्रान्सहार्बर प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार; २४०० टनाच्या डेकची यशस्वी उभारणी

‘मी माझ्या मतदार संघाची भेट घेतली नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. विशेष म्हणजे स्त्री मतदार यावेळी अधिक सक्रिय आहेत. आम्ही रमेश लटके यांचे राहिलेले कार्य पूर्ण करायचा प्रयत्न करू. पाण्याच्या समस्या आहेत या भागात आहेत त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करेन. आमचे सर्व कार्यकर्ते माझ्यापेक्षा जास्त सक्रिय आहेत. प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे.’ – ऋतुजा लटके ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )

‘आम्हाला निवडणुकीच्या प्रचाराआधी लोकांना हेच समजवावे लागले की ही निवडणूक होणार आहे. सर्वांचा असा समज झाला होता की आता निवडणूक होणार नाही. आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्ही बोटावर मोजण्या एवढे कार्यकर्ते होतो पण नंतर आमचे कार्यकर्ते वाढले. मला आनंद आहे प्रत्येक जण फार मनापासून काम करत आहे. मी जेव्हा या संपूर्ण विभागात फिरले तेव्हा मला जाणवले की लोक कोरोना काळात किती अडचणींना सामोरे गेले असतील म्हणून मी ही निवडणूक लढवायची ठरवली.’ – नीना खेडेकर (अपक्ष)

‘अंधेरीमध्ये ऋतुजा लटके, नीना खेडेकर आणि बाला नाडर यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यांनी आमची भेट घेतली, समस्या विचारल्या. – स्थानिक रहिवाशी व रिक्षा चालक