मुंबईत आकर्षक-रंगीबेरंगी खड्डे कधी बघितले आहेत का ? | The Watchdog Foundation painted potholes in colors to draw attention to potholes on Mumbai roads mumbai print news amy 95 | Loksatta

मुंबईत आकर्षक-रंगीबेरंगी खड्डे कधी बघितले आहेत का ?

मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशनने नऊ रंगात खड्डे रंगवले आहेत.

मुंबईत आकर्षक-रंगीबेरंगी खड्डे कधी बघितले आहेत का ?
मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशनने नऊ रंगात खड्डे रंगवले आहेत

मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशनने नऊ रंगात खड्डे रंगवले आहेत.वॉचडॉग फाऊंडेशनने हे अनोखे आंदोलन सोमवारपासून सुरू केले असून पहिल्याच दिवशी अंधेरी पूर्वेकडील विविध रस्त्यांवरील खड्डे रंगवण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे उठून दिसत होते. अंधेरी परिसरात विमानतळाकडे जाणारा रस्ता, मेट्रो स्थानक परिसर, मरोळ चर्च रोड येथील खड्डे नऊ रंगात रंगवण्यात आले होते.खड्ड्यावरून पालिकेवर व अन्य प्राधिकरणांवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. न्यायालयानेही पालिकेला फटकारले आहे.

हेही वाचा >>> पत्रा चाळ प्रकरणी सत्ताबदलानंतर म्हाडाकडून वादग्रस्त तपशील सादर

मुंबईतील मुख्य रस्ते वगळता आतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेने नवरात्रीमध्ये खड्डे नऊ रंगात रंगवण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. वाचडॉग फाउंडेशनचे कार्यकर्ते पिमेंटा गोडफ्रे, निकोलस अल्मेडा, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अन्सारी हे या आंदोलनात सहभागी झाले होते. रंगीबेरंगी खड्ड्यांच्या या आंदोलनाची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पत्रा चाळ प्रकरणी सत्ताबदलानंतर म्हाडाकडून वादग्रस्त तपशील सादर

संबंधित बातम्या

धारावीचं टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळावं म्हणून सीमावाद पुढे आणला जातोय का? शरद पवार म्हणाले…
खारमध्ये डिलिव्हरी बॉयकडून घरात घुसून महिलेचा विनयभंग, पीडिता म्हणाली, “त्याने माझे…”
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती
हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; भायखळा-माटुंगादरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक
गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शिंदे सरकारला ‘नामर्द’ म्हणणाऱ्या राऊतांना शंभूराज देसाईंचा इशारा; म्हणाले, “तोंड आवरावं, अन्यथा पुन्हा…”
पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा; पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचे आदेश
आधी निषेध मग लग्न! खराब रस्त्याला कंटाळलेला नवरदेव लग्न सोडून थेट आंदोलनात पोहचला
Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं