मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावू लागला असून सातही धरणांमध्ये मिळून सध्या केवळ १२.७६ टक्के पाणी शिल्लक आहे. पुढचे केवळ २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असताना राखीव साठय़ाचा वापर करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पाऊस लांबल्यास मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांत मिळून केवळ १२.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उध्र्व वैतरणा धरणातील वापरण्यायोग्य पाणीसाठा शून्यावर आला आहे. उपशामुळे अन्य धरणांतील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाणीसाठय़ातूनच मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे. सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ २५ दिवस पुरेल, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The water storage in the dams supplying water to the city of mumbai began to deplete rapidly amy
First published on: 01-06-2023 at 04:15 IST