Premium

समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पावरून वाद; काँग्रेसकडून आशिष शेलार यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पावरून काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांना डिवचले आहे.

There is a controversy over the sea water desalination project and the Congress demands Ashish Shelar to clarify his position
आशिष शेलार ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पावरून काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांना डिवचले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पास विरोध करणारे शेलार हे महायुतीच्या काळात महापालिकेकडून या प्रकल्पासाठी निविदा मागविल्या असताना गप्प कसे, असा सवाल सावंत यांनी केला आहे. यावर भूमिकेवर ठाम असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकल्पावरून शेलार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आणि जनतेच्या पैशांची लूट असल्याचे आरोप केले होते. सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची गरजच काय, समुद्रात मुंबईचे सुमारे ४०० कोटी लिटर सांडपाणी सोडले जाते, त्यात प्लॅस्टिक, सेंद्रीय पदार्थ व जीवाणूही असतात. उद्धव ठाकरे हे दुर्गंधीयुक्त प्रदूषित पाणी कमिशन मिळविण्यासाठी गोडे करून मुंबईकरांना पाजणार आहेत. आता तुम्हाला पाणी पाजण्याची वेळ जवळ येत आहे, असे शेलार यांनी नमूद केले होते.

हेही वाचा >>>महिला डॉक्टरची अश्लील चित्रफीत तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

मनोरी येथे होणाऱ्या या सुमारे तीन हजार ५२० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. सावंत यांनी शेलार यांच्या आघाडी सरकारच्या काळातील वक्तव्यांचा उल्लेख करून भाजपला असा बदल कसा जमतो? असा प्रश्न केला आहे.

काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी – शेलार

मी आपल्या भूमिकेवर ठामच असून काँग्रेसने या प्रकल्पाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असे शेलार यांनी सांगितले. काँग्रेस शिवसेनेबरोबर सत्तेत असताना त्यांनी या प्रकल्पाचे समर्थन केले होते. पण आता सावंत यांनी प्रकल्पासंदर्भात मुद्दा उपस्थित केल्याने त्यांचा प्रकल्पास विरोध आहे की पाठिंबा, हे जाहीर करावे, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There is a controversy over the sea water desalination project and the congress demands ashish shelar to clarify his position amy

First published on: 08-12-2023 at 05:33 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा