scorecardresearch

Premium

विमा कंपन्यांचा आडमुठेपणा; शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सरकारने यंदा शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विम्याची सुविधा दिली आहे.

There is concern in the cabinet meeting as the farmers are not getting help from the insurance companies
विमा कंपन्यांचा आडमुठेपणा; शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता

मुंबई: पुरेशा पावसाअभावी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून तातडीने मदत देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतरही विमा कंपन्या आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आता धूसर होत आहे.  यावरूनच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विमा कंपन्यांच्या या मनमानी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र कंपन्यांवर कारवाई करता येत नसल्याबद्दलची सरकारची हतबलताही दिसून आली.  

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सरकारने यंदा शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विम्याची सुविधा दिली आहे. त्यानुसार १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी ११३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे. मात्र ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान अपेक्षित पाऊस न झाल्याने पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नियमानुसार सलग २१ दिवस पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना विम्याच्या २५ टक्के  नुकसानभरपाईची अग्रीम देणे विमा कंपन्यांना बंधनकारक आहे. मात्र या दिवसात काही ठिकाणी किरकोळ पाऊस झाल्याची बाब पुढे करीत विमा कंपन्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव नाकरणे सुरू केले आहे.

modi government direct factories to pay rs 3400 frp for sugarcane per tonne
उसाला आजवरची उच्चांकी एफआरपी मिळणार ? जाणून पंतप्रधान मोदींनी कारखान्यांना काय आदेश दिले
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
BJP Dindori Gaon Chalo Campaign
गाव चलो अभियानात भाजपचे दिंडोरी मतदारसंघावर लक्ष; मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचा ३०० गावांत मुक्काम
mumbai drug license marathi news, mumbai drug shops marathi news
औषध परवान्यांच्या निलंबनाऐवजी दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव, निलंबन रद्द करण्याचे अधिकार फक्त मंत्र्यांना!

हेही वाचा >>>मुंबईकरांचा श्वास कोंडला! वाढत्या प्रदुषणामुळे मास्क वापरण्याचं आवाहन? पालिकेने दिलं स्पष्टीकरण…

नमो महासन्मान निधीचे मोदी यांच्या हस्ते वितरण

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचणी येत असल्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हप्तय़ाचे वाटप २६ ऑक्टोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्तय़ासाठी १७२० कोटी रुपयांची मदत  ९३. ०७ लाख शेतकऱ्यांना केली जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There is concern in the cabinet meeting as the farmers are not getting help from the insurance companies amy

First published on: 20-10-2023 at 02:20 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×