परळ, शिवडी, नायगाव, वडाळा परिसरात शुक्रवारी पाणी नाही; दादरमध्ये जलवाहिनी फुटली

दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटल्याने शुक्रवारी ८ जुलै रोजी परळ, शिवडी, नायगाव, वडाळा परिसराचा भाग असलेल्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये सकाळी पाणीपुरवठा होणार नाही.

Water Supply Stop
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटल्याने शुक्रवारी ८ जुलै रोजी परळ, शिवडी, नायगाव, वडाळा परिसराचा भाग असलेल्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये सकाळी पाणीपुरवठा होणार नाही. दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखान्यासमोर १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जलकामे विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे  उद्या शुक्रवारी ८ जुलै रोजी दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी, दादर, नायगाव, लालबाग, वडाळा,  परळ,  काळाचौकी,  शिवडी या भागांमध्ये पहाटे ४.०० ते सकाळी १०.०० या वेळेत पाणी पुरवठा होणार नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There is no water in paral shivdi naigaon wadala areas friday dadar mumbai print news ysh

Next Story
महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी मुंब्र्यामध्ये रँली; अग्नीवीर व्हायचंय, मग हे नक्की वाचा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी