एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. एसटी महामंडळाने या अधिकाराचा वापर करून २१ ऑक्टोबरपासून १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), ‘शिवशाही’ (आसन) व शयन आसनी बसगाड्यांना लागू आहे. मात्र ‘शिवनेरी’ आणि ‘अश्वमेध’ या बसगाड्यांना ही भाडेवाड लागू नाही, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, २३ व्या मजल्यावरुन मारली उडी

onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
pune , pune rain marathi news
उकाड्यापासून दिलासा…आजपासून तीन दिवस पाऊस
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

या भाडेवाढीमुळे दादर-स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या साध्या बसचे भाडे २३५ रुपयांवरून २६० रुपये, तर शिवशाहीचे भाडे ३५० रुपयांवरून ३८५ रुपये होईल. या कालावधीत मुंबई-औरंगाबाद दरम्यान साध्या बसने प्रवास करण्यासाठी ८६० रुपयांऐवजी ९५० रुपये भाडे मोजावे लागेल. तसेच ‘शिवशाही’च्या भाड्यात १३० रुपयांनी करण्यात आली असून ‘शिवशाही’चे भाडे १,२८० रुपयांवरून थेट १,४१० रुपयांवर पोहोचले आहे. आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशाकडून वाहक प्रवासादरम्यान तिकीट दरातील तफावतीची रक्कम वसूल करणार आहेत. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास, तसेच मासिक आणि त्रैमासिक, तसेच विद्यार्थी पाससाठी लागू करण्यात येणार नाही, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.