Salman Khan Threat Call From गेल्या महिन्याभरात बॉलिवुड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं दिसून आलं आहे. यातल्या काही धमक्या तपासाअंती फक्त खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी काही बाबतीत मुंबई पोलीस सखोल तपास करून धमकी देणाऱ्यांचा माग काढत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीमुळे मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात वरळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची गेल्या महिन्यात दोन व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. नंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. तसेच, आपला रोख सलमान खानच्या दिशेनं असल्याचंही बिश्नोई गँगकडून स्पष्ट करण्यात आलं. यासंदर्भातली एक पोस्ट सोशल मीडियावर करण्यता आली होती. ती पोस्ट करणाऱ्यालाही पोलिसांनी नंतर अटक केली. जीव वाचवायचा असेल तर बिश्नोई गँगच्या अटी मान्य करण्याचाही अल्टिमेटम त्यात देण्यात आला होता. तेव्हापासून सलमान खानला सातत्याने अशा धमक्या येत असून त्या लॉरेन्स बिश्नोई गँगकडूनच येत असल्याचं बोललं जात आहे.

Sidhu Moosewala baby brother face reveal
सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाला पाहिलंत का? गोंडस शुभदीपचा फोटो पाहून चाहते म्हणाले, “Sidhu is Back”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

नव्याने आलेली धमकीही बिश्नोई गँगकडून?

दरम्यान, एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता सलमान खानला नव्याने आलेल्या धमकीमागेही लॉरेन्स बिश्नोई गँगच असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवारी रात्री मुंबईच्या वाहतूक शाखेला हा धमकीचा मेसेज मिळाला. त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा उल्लेख असल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात वरळी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबत सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Salman Khan: लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांवर सलमान खानचे वडील सलीम खान यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले…

लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात, भाऊ विदेशात!

दरम्यान, बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा गुजरातमधील तुरुंगात आहे. पण तो तुरुंगातूनच त्याची गँग चालवतो व कारवायांचं नियोजन करून त्या पूर्ण करण्याचे आदेशही देतो असे दावे केले जात आहेत. यासंदर्भात बिश्नोईचा तुरुंगातून केलेला एक व्हिडिओ कॉलही मध्यंतरी व्हायरल झाला होता. दुसरीकडे लॉरेन्सचा भाई अनमोल बिश्नोई हा अमेरिकेत असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने पावलं उचलायला सुरुवातही केली आहे. लॉरेन्स तुरुंगात असताना त्याचा भाऊ बाहेर राहून गँगच्या गुन्हेगारी कृत्यांचं नियोजन करत असल्याचं सांगितलं जात आहे.

Story img Loader