मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिमच्या साथीदाराने आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या २९ वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामरान आमीर खान (२९) असे अटक आरोपीचे नाव असून तो शीव येथील न्यू म्हाडा कॉलनी परिसरात वास्तव्यास आहे. आरोपीने रविवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दाऊद इब्राहिमच्या साथीदाराने आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारण्यास सांगितले आहे. तसेच जे.जे. रुग्णालयात आपली वैद्यकीय तपासणी झाली नाही, तर रुग्णालयात बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी त्याने दिली. याप्रकरणाची माहिती गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना देण्यात आली. आझाद मैदान पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे याप्रकरणी सार्वजनिक आगळीक निर्माण करण्याचा प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी आरोपी खानला अटक केली. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीची माहिती घेऊन त्याला राहत्या घरातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – दिवाळखोर रिलायन्स कॅपिटलवर ‘हिंदुजां’च्या पाच संचालकांच्या नियुक्तीला रिझर्व्ह बँकेची सशर्त मान्यता

गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणाबाबत केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, भल्या पहाटे पाहणी दौरा

पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तिक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडकवण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतरही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासाबरोबर सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

Story img Loader