समाज माध्यमांवर चित्रीकरण प्रसारित केल्याचा आरोप; प्रियकरासह दोघांविरोधात गुन्हा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः सोशल ॲपच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या प्रियकराने २३ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग करून तिचे चित्रिकरण समाज माध्यमांवर प्रसारित करणाची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने इन्स्टाग्रमावर तिचे चित्रिकरणही प्रसारित केले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तरूणीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 तक्रारदार तरुणी मध्य प्रदेशातील इंदौरमधील रहिवाशी असून ती सध्या मुंबईमधील जोगेश्वरी परिसरात राहते. क्लब हाऊस या ॲपच्या माध्यमातून ती जून २०२२ रोजी एका तरूणाच्या संपर्कात आली होती. ओळख झाल्यानंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आणि त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आरोपी प्रियकर हा उत्तर प्रदेशच्या बनारसमधील रहिवासी असून तो तिला नेहमीच बनारसला बोलावत होता. त्यामुळे जून महिन्यात ती त्याला भेटण्यासाठी बनारसला गेली होती. १६ ते १८ जूनदरम्यान ती त्याच्यासोबत त्याच्या घरी राहत होती. यावेळी त्याने तिच्याकडून २५ हजार रुपये घेतले होते. तसेच त्याने आंघोळ करताना तिचे चित्रीकरण होते. त्याच्यासोबत असताना तिने त्याच्या मोबाइलमध्ये इतर काही तरुणींची आक्षेपार्ह छायाचित्रे आणि संदेश पाहिले होते. त्यामुळे तिला धक्का बसला होता.

हेही वाचा >>> मित्रांनी घरी आयोजित केलेल्या पार्टीत नशेच्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीवर बलात्कार; पुण्यातील वारजेमधील धक्कादायक घटना

ही बाब लक्षात येताच तिने त्याच्याशी संबंध तोडले होते. या घटनेनंतर ती तिच्या इंदौर येथील घरी गेली होती. तिथे काही दिवस राहिल्यानंतर ती मुंबईत परत आली. मुंबईत आल्यांनतर तिने आरोपीकडे २५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र त्याने तिला पैसे देण्यास नकार दिला. तसेच पैसे मागितल्यास तिची अश्लील चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. काही दिवसांपूर्वी तिचे चित्रिकरण इंटाग्रामवर एका महिलेच्या अकाऊंटवरून प्रसारित झाल्याचे तिला समजले. हा प्रकार निदर्शनास येताच तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार तेथे उपस्थित पोलिसांना सांगितला. त्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकरासह एका महिलेविरुद्ध विनयभंग, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threatened to broadcast obscene footage of molesting a young woman mumbai print news ysh
First published on: 30-11-2022 at 17:51 IST