मुंबईः पासपोर्टसाठी आईच्या जन्माचा बनावट दाखला सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी तिघांना मालवणी पोलिसांनी अटक केली. शाहरुख आझाद शेख, शाबाज हसीन अहमद खान आणि सुरज शिवकुमार सावजयकर अशी या तिघांची नावे आहेत. तीनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून ऑक्टोबर महिन्यांत त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. या अर्जाला त्याने त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, विद्युत देयक, आई शानूबाई शेख यांचा मृत्यूचा दाखला, शानू मोहम्मद खान यांचा जन्माचा दाखला तसेच बँक खात्याच्या माहितीची दुय्यम प्रत जोडली होती. या अर्जाची मालवणीतील पासपोर्ट विभागाच्या कर्मचार्‍यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात त्याने त्याच्या आईच्या जन्मदाखल्याची बनावट प्रत सादर केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
त्यामुळे त्याला कागदपत्रांची शहानिशा करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.

हेही वाचा: “लवकरच कठोर पावलं…”, संजय राऊतांचं सूचक विधान, राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण आणखीन तापणार?

तेथे त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या आईचा जन्माचा दाखला बनावट असल्याची कबुली दिली. तो दाखला त्याला शाबाज खानने तयार करून दिल्याचे सांगितले. स्वतःच्या पासपोर्टसाठी त्याने त्याच्या आईचा जन्माचा दाखला बनावट सादर केल्याचे उघडकीस येताच पोलीस शिपाई हंसराज खंडेराय यांनी शाहरुखसह इतर आरोपीविरुद्ध बनावट कागदपत्र सादर करुन सरकारची फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच शाहरुख खान, शाबाज आणि सुरज सावजयकर या तिघांना पोलिसांनी अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three acsued arrested for submitting fake documents for passports crime malvani police mumbai print news tmb 01
First published on: 27-11-2022 at 12:02 IST