scorecardresearch

मुंबई : दोन लाख रुपयांसाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तिघांना अटक

एका तरुणीने दोन लाख रुपयांसाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना सोमवारी वडाळा परिसरात घडली.

Three arrested for kidnapping three-year-old boy
पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : एका तरुणीने दोन लाख रुपयांसाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना सोमवारी वडाळा परिसरात घडली. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणी आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली.

crime news
बँक खात्यातून १६ हजार कोटी रुपयांची उलाढाल; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा
property tax arrears
पिंपरी : महापालिकेच्या ४१ हजार मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटिसा, होणार ‘ही’ कारवाई
railways increases ex gratia relief for kin in train accidents by 10 times
रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना आता पाच लाख रुपये; तब्बल ११ वर्षांनी भरपाई रकमेत दहापटीने वाढ
Blood bank
मुंबई: सहा वर्षांत रक्तपेढ्यांनी रुग्णांची केली लूट

वडाळा परिसरात वास्तव्यास असलेले सुमन चौरसिया यांचा तीन वर्षांचा मुलगा सोमवारी दुपारी घराबाहेर खेळत होता. तो अचानक गायब झाला. याबाबत चौरसिया यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणी केली. याच परिसरात वास्तव्यास असलेली सानिका वाघमारे (१८) या मुलाला घेऊन जात असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसले. त्यानुसार पोलिसांनी सिनिकाचा शोध सुरू केला.

आणखी वाचा-मुंबई : जुन्या इमारतीतील रहिवाशांची ‘मास्टर लिस्ट’ पुन्हा अद्ययावत होणार!

काही वेळातच दोन इसम अपहरण झालेल्या मुलाला घेऊन वडाळा पोलीस ठाण्यात आले. आरोपी तरुणीनेच या मुलाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास त्यांना सांगितले होते. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. त्यानंतर आरोपी तरुणीला अटक करून तिची चौकशी करण्यात आली. पवन पोखरकर (२०) याने या मुलाचे अपहरण करण्यास सांगितल्याचे सानिकाने कबुल केले. यासाठी पवन तिला दोन लाख रुपये देणार होता. सानिकाच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी पवन आणि त्याचा साथिदार सार्थक बोंबले या दोघांना अटक केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three arrested for kidnapping three year old boy for two lakh rupees mumbai print news mrj

First published on: 21-11-2023 at 16:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×