मुंबई : मुंबई सेंट्रल येथे महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत तस्करीतील सोने लपवण्यासाठी जाणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींकडून २३ किलो सोने हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १७ कोटी रुपये आहे. गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रल येथे सोने घेऊन जात असताना आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा सहभाग उघड झाला आहे.

पायल जैन(३९), पंखुदेवी माली(३८), राजेश कुमार जैन(४३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यातील पंखुदेवी भुलेश्वर येथील रहिवासी आहे, तर पायल व राजेश दोघेही मुंबई सेंट्रल येथील रहिवासी आहेत. राजेश व त्याचा साथीदार रमेश यांच्या सांगण्यावरून तिघेही फणसवाडी येथून सोने घेऊन मुंबई सेट्रल येथील घरी ठेवण्यासाठी घेऊन जात होते. त्याबाबतची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानुसार डीआरआयने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेच्या झडतीत २२.८९ किलोग्रॅम तस्करी केलेले सोने सापडले. याशिवाय तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीच्या उत्पन्नाचे ४० लाख रुपये घरात लपवले होते. ती रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत १६ कोटी ९१ लाख रुपये आहे. आरोपींविरोधात सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

A march was taken out at Wadala Agar of the BEST initiative under the leadership of Sangharsh Samgar Karmary Union Mumbai news
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा मोर्चा
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Diwali bonus for permanent employees but not for contract employees
कायमस्वरूपींना बोनस पण कंत्राटी मात्र वाऱ्यावर!
Pune Municipal Corporation has been hit by the Smart City project
पुणेकरांना ४४ कोटींचा ‘स्मार्ट’ हिसका, काय आहे प्रकरण!
mandul snake that is sold for lakhs of rupees is given life
लाखो रुपयांना विकल्या जाणाऱ्या सापाला जीवदान
Violation of conditions laid down in the SOP by the builders
नवी मुंबई : बांधकाम नियमावलीचे कागदी घोडे
Three people from Ulhasnagar who sold stolen iPhones to customers arrested in Kalyan
चोरीचे आयफोन ग्राहकांना विकणारे उल्हासनगरमधील तीनजण कल्याणमध्ये अटकेत
pune vanchit Bahujan aghadi
शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य प्रकरणात जप्त केलेली गाडी फोडली, वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा

हेही वाचा >>>Western Railway Block: पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा ब्लॉक

खबरी असल्याचा संशय

याप्रकरणातील एक आरोपी केंद्रीय यंत्रणांचा खबरी होता. तो व त्याचे साथीदार विविध व्यापाऱ्यांना तस्करीतील सोने विकून देण्याचे आश्वासन द्यायचे. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून सोने घ्यायचे. त्यातील काही सोने आधीच काढून घेऊन व्यवहाराच्या बहाण्याने सोने पकडून द्यायचे. अशा प्रकारे आरोपींनी हे सोने जमा केल्याचा संशय आहे.