लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: भारतात अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना पार्क साईट पोलिसांनी अटक केली. यापैकी एक जण गेल्या २५ वर्षांपासून मुंबईत अनधिकृतरित्या राहात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…
One crore of fraud with doctor Pretending to find narcotics in an overseas courier
डॉक्टरची एक कोटींची फसवणूक! परदेशातील कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची बतावणी

विक्रोळीमधील पार्क साईट परिसरातील लोअर डेपो येथे काही बांगलादेशी नागरिक अनधिकृतरित्या राहात असल्याची माहिती पार्क साईट पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी परिसरात सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. युसूफ सोफान (५८), मोमीनउल्लक शेख (५२) आणि उमेदउल्लक नुरूलहक (६९) अशी या तिघांची नावे आहेत. यापैकी युसूफ काही वर्षांपूर्वी भारतात आला होता. मात्र २०२० मध्ये व्हिसा संपलेला असतानाही तो भारतातच राहिला. मोमीनउल्लक हाही अनधिकृतरित्या भारतात राहात होता.

आणखी वाचा-सध्याचे शिक्षण परवडण्यासारखे राहिलेले नाही, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे सरकारची घटनात्मक जबाबदारी

धक्कादायक बाब म्हणजे उमेदउल्लंक नुरूलहक २५ वर्षांपूर्वी घुसखोरी करून भारतात आला होता. गेली २५ वर्ष तो मुंबईत अनधिकृतरित्या राहात असल्याचे चौकशीत उघड झाले. अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक भारतात असण्याची शक्यता असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.