लाच घेणारे तीन अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

तक्रारदार व्यक्ती कार्यरत असलेल्या विकासकाला इमारतीचा निवासी दाखला मिळाला नव्हता. त्यामुळे इमारतीचा पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

मुंबई : इमारतीच्या नळजोडणीला परवानगी देण्यासाठी दोन लाख ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी पकडले. तक्रारदार व्यक्तीकडून हे आरोपी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात सापडले. सचिन गणपत खोदडे (३९) आणि विश्वंभर प्रल्हादराव शिंदे (२८) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार व्यक्ती कार्यरत असलेल्या विकासकाला इमारतीचा निवासी दाखला मिळाला नव्हता. त्यामुळे इमारतीचा पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही. परिणामी मानवतेच्या दृष्टीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी तक्रारदाराने पालिका अधिकाऱ्यांकडे केली होती. शिंदे याने नळजोडणी देण्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी केली. एसीबीने सोमवारी सापळा रचला होता. यावेळी खोदडे याने दोन लाख ५० हजार द्यावे लागतील असे तक्रारदाराला शिंदेमार्फत सांगितले. लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने पकडले.

आरे वसाहतीचा अधिकाऱ्यालाही पकडले

अन्य एका कारवाईत गोरेगाव येथील आरे दुग्ध वसाहतीत घर आणि दुकान अनधिकृत असल्याचे सांगून कारवाई न करण्याकरिता लाच मागणाऱ्या उपमुख्य दक्षता अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला. उदास दाजी तुळसे (४८) असे आरोपीचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने सोमवारी त्याला पकडले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three bribe takers caught by acb mumbai ssh

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या