आयपीएल सट्टेबाजांना पनवेलमधून अटक

आयपीएलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी पनवेलच्या मिडलक्लास सोसायटीमधून शुक्रवारी रात्री अटक केली आहे.

आयपीएलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या त्रिकुटाला पनवेल शहर पोलिसांनी पनवेलच्या मिडलक्लास सोसायटीमधून शुक्रवारी रात्री अटक केली आहे.
सट्टेबाजांकडून यावेळी पोलिसांना सव्वा लाख रुपये रोख व सहा मोबाइल फोन सापडले.
चेन्नई सुपरकिंग व रॉयल चॅलेंजर्स या संघांदरम्यान चाललेल्या सामन्यावेळी पोलिसांना दीपा बारच्या मागे असणाऱ्या साई आर्केड इमारतीमध्ये हा सट्टाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही धाड टाकली.     रात्री साडे दहा वाजता पोलिसांनी याप्रकरणी मंजुनाथ शेट्टी, सुभाष शेट्टी व संदीप सिया यांना घटनास्थळावरून अटक केली.
या सट्टेबाजांनी किती सामन्यांवर सट्टा लावला याची चौकशी सुरू असल्याची माहिती पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three ipl bookies arrested from panvel

ताज्या बातम्या