तीन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत

असाबुल मुसा शेख आणि असीम कर्माकर अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : पश्चिम बंगालच्या मालदा, मुर्शिदाबाद येथील दोन तरुणांना गुन्हे शाखेने तीन लाख रुपयांच्या बनावट नोटांसह भायखळा येथून अटक केली. या दोघांकडून हस्तगत नोटा उच्चप्रतीच्या आहेत, असे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

निश्चलनीकरणाआधी पश्चिम बंगालच्या मालदा, मुर्शिदाबाद, नदीया, २४ परगणा या बांगलादेश सीमावर्ती जिल्ह्य़ांमधून मोठय़ा प्रमाणावर बनावट नोटा देशभर वितरित होत असत. सीमेपलीकडून या नोटा पश्चिम बंगालमध्ये येत. नोटांचा दर्जा पाहिल्यावर त्या सीमेपलीकडून आल्या असाव्यात अशी शक्यता गुन्हे शाखेकडून व्यक्त होत आहे.

असाबुल मुसा शेख आणि असीम कर्माकर अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या १२ तर दोन हजार रुपयांच्या १४७ नोटा सापडल्या. बाजारपेठेत या नोटा वटवण्याचा त्यांचा बेत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three lakh fake currency seized by mumbai police

ताज्या बातम्या