मुंबई : महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर या महत्त्वाच्या आणि मोठ्या रुग्णालयांमध्ये वारंवार सीटी स्कॅन यंत्रणा बंद असण्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात येत असतात. त्यामुळे, रुग्णांना खासगी केंद्रावरून सीटी स्कॅन करावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. परिणामी गरीब रुग्णांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. मात्र, रुग्णांचा हा त्रास लवकरच संपणार आहे. महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांमध्ये लवकरच नवीन सीटी स्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे, रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांमध्ये दररोज किमान पाच ते सहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, यातील रुग्णांना डॉक्टरने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यास रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रणा एकतर बंद असते किंवा चार ते पाच महिन्यांची प्रतिक्षा यादी असते. उपचार जलद गतीने व्हावेत यासाठी नागरिकांना नाईलाजास्तव खासगी केंद्रामधून चाचणी करावी लागते. मात्र, जी चाचणी महापालिकेच्या रुग्णालयात हजार ते १२०० रुपयांत होते. त्याच चाचणीसाठी खासगी सीटी स्कॅन केंद्रांवर चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे, रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसतो.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

हेही वाचा – मोबाईल दुरुस्तीला देताय? काळजी घ्या, दुरुस्तीसाठी दिलेल्या मोबाईलवरून पैसे हस्तांतरीत करून फसवणूक

हा खर्च खिशाला परवडणारा नसला तरी करावा लागतो. मात्र आता केईएम, शीव आणि नायर रुग्णालयातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या तिन्ही रुग्णालयांमध्ये नवीन सीटी स्कॅन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सीटी स्कॅन यंत्र आणण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या तिन्ही रुग्णांना नवीन यंत्र मिळणार आहे, त्यामुळे सवलतीच्या दरात आणि वेळेत चाचणी होऊन रुग्णांवर योग्य उपचार करण्यास मदत होणार आहे.