three year old girl raped and killed in bhiwandi second case in last three days spb 94 | Loksatta

धक्कादायक! भिवंडीत तीन वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून निर्घृण हत्या; तीन दिवसांतील दुसरी घटना

भिवंडीत तीन वर्षांच्या चिमुकलवर बलात्कार करून तिचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

bhiwandi three year old girl raped and killed
प्रातिनिधिक छायाचित्र

भिवंडीत तीन वर्षांच्या चिमुकलवर बलात्कार करून तिचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी तिच्या घराजवळील एका चाळीत पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांतली ही दुसरी घटना आहे. मंगळवारी भिवंडीतील २६ वर्षीय तरुणांने शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती.

हेही वाचा – मुंबई – घाऊक मासळी बाजार स्थलांतरीत करण्याला विरोध, याचिकेवर सुनावणी हवी असल्यास अडीच लाख जमा करण्याचे आदेश

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीचे आई-वडील उत्तर प्रदेशातील रहिवासी असून ते गेल्या काही वर्षांपासून भिवंडीत राहत आहेत. वडील हे भंगाराच्या दुकानात मजुरी करतात, तर आई बॅग बनवण्याच्या कारखान्यात काम करते. दरम्यान, मंगळवारी जेव्हा दोघेही कामावर गेले, तेव्हा मुलगी आणि तिचे दोन भाऊ घरी होते. सायंकाळी जेव्हा ते परत आले, तेव्हा मुलगी दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध केली. मात्र, ती मिळून न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा – मुंबई: मध्य रेल्वेवर १५ डबा लोकलच्या अतिरिक्त फेऱ्यांना खिळ

बलात्कार करून हत्या?

आई-वडीलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध घेतला असता, त्यांना जवळच्या एका चाळीत मुलीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, प्राथमिक तपासानंतर मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगण्यात आलं आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 10:08 IST
Next Story
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात; एकनाथ शिंदे म्हणाले, “प्रत्येकाला…”