लसीकरण झालेल्यांना ‘अ‍ॅप’द्वारे तिकीट सेवा?

दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस उलटून गेलेल्या प्रवाशांसाठी लवकरच मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा सुरू करण्याचा विचार मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन करत असून युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला (यूटीपी) मोबाइल तिकीट अ‍ॅप जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला तिकीट अ‍ॅपशी जोडण्याचा रेल्वेचा विचार

मुंबई : दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस उलटून गेलेल्या प्रवाशांसाठी लवकरच मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा सुरू करण्याचा विचार मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन करत असून युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला (यूटीपी) मोबाइल तिकीट अ‍ॅप जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्या वेळी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या सुकर प्रवासासाठी मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा सुरू करण्यावर चर्चा झाली. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांसाठीही सुरू करण्यात आली. सुरुवातीला मासिक पास तर त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारच्या सूचनेनंतर तिकीट सुविधाही उपलब्ध करून दिली. एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट सेवा आणि मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा बंद असल्याने पास आणि तिकीट काढण्यासाठी काही स्थानकांत तिकीट खिडक्यांसमोर गर्दी होऊ लागली. त्यामुळे मोबाइल तिकीट अ‍ॅपची सुविधाही उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सुनीत शर्मा यांची मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर बैठक झाली. या बैठकीत उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल तिकीट अ‍ॅप सेवा उपलब्ध करण्यावर चर्चा झाली. यातून प्रवाशांना तिकीट व पास उपलब्ध केल्यास तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे सुकर प्रवासासाठी ही सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शर्मा यांनी मध्य व पश्चिम रेल्वेला दिल्या.

तिकीट, पास उपलब्ध

दोन लसमात्रा घेतलेल्यांची नोंद मोबाइलवर उपलब्ध युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासवरही होते. आता हा ट्रॅव्हल पास तिकीट खिडक्यांवर दाखवल्यास लोकलचे तिकीट किं वा पास उपलब्ध होतो. मात्र मोबाइल तिकीट अ‍ॅपला त्याची जोड दिल्यास पुन्हा स्थानकात जाऊन तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मोबाइल अ‍ॅप तिकीट सेवेतूनच तिकीट व पास उपलब्ध होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ticket vaccinated people app ysh

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही