scorecardresearch

Premium

आजीला वाचवण्यासाठी गेलेल्या तिशाचा धुरामध्ये गुदमरून मृत्यू

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीच्या गाडी पार्किंगमध्ये ठेवलेल्या चिंध्यांना गुरूवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास भीषण आग लागली.

child death due to accidentally hanging at home
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीच्या गाडी पार्किंगमध्ये ठेवलेल्या चिंध्यांना गुरूवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे संजय चौगुले यांच्या घराला आगीची झळ लागली. यावेळी झोपेतून उठून सर्वजण आपल्या जीव वाचविण्यासाठी धावले. मात्र बाजूच्या घरामध्ये असलेल्या आजीला वाचविण्यासाठी संजय चौगुले यांची मुलगी तिशा चौगुले (१७) हिने धाव घेतली. घरात पसरलेल्या धुरातून आपल्या आजीचे तिशाने सुखरूप सुटका केली. मात्र तिला स्वत: जीव वाचविण्यात अपयश आले. तिशाच्या मृत्यूमुळे चाैगुले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जय भवानी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत असलेले संजय चौगुले हे रियल इस्टेटचा व्यवसाय करतात. तसेच ते जय भवानी सोसायटीचे सचिवही आहेत. रात्री २.३० वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये ठेवलेल्या चिंध्यांना आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीची झळ पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या कुटुंबियांना लागलती तसेच त्यांच्या घरामध्येही धूर शिरला. त्यामुळे लोकांची धावपळ उडाली. पहिल्या मजल्यावर राहत असलेले संजय चौगुले यांनीही आग लागल्याचे पाहताच तातडीने घरातील सर्वांना उठविले आणि त्यांना घरातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांच्या शेजारच्या घरात राहत असलेल्या आपल्या आजीला म्हणजे संजय चौगुले यांच्या आईला बाहेर काढण्यासाठी तिशा धावली.

man committed suicide mumbai
मुंबई : मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या
indian government, fencing, indo-myanmar border, surveillance, chin national front, Mizoram, Manipur, Nagaland, Arunachal Pradesh
म्यानमारच्या सीमेवरले संभाव्य कुंपण कुणाला टोचणार?
Two injured during demolition mumbai
बोरिवली येथे इमारतीच्या पाडकामादरम्यान दोन जखमी, राडारोडा चालत्या रिक्षावर पडला
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

तिशाने तिला सुखरूप घरातून बाहेर काढले. तसेच दरवाजाला कुलुप लावण्यासाठी ती थांबली. मात्र त्याचवेळी वाढलेल्या धुराच्या लोटामध्ये तिशाचा जीव गुदरमला आणि तेथेच ती कोलमडून पडली. तिशा हिने नुकतेच पाटकर महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिने प्रथम वर्ष वर्गात प्रवेश घेतला होता, अशी माहिती तिचे वडील संजय चौगुले यांनी दिली. घरामध्ये सर्वांची लाडकी असलेल्या तिशाने तत्परता दाखवत आपल्या आजीचा जीव वाचविला. मात्र स्वत:चा जीव वाचविण्यात ती अपयशी ठरल्याने चौगुले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tisha who went to save her grandmotherdied of suffocation in fire smoke mumbai print news ysh

First published on: 06-10-2023 at 21:23 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×