आजचा कार्यक्रम सकाळी ०७ : ०० - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी सात वाजल्यापासून वांद्रे येथील 'मातोश्री' निवासस्थानापासून निघेल आणि दादरला शिवाजी पार्कवर पोहचेल. सकाळी १० : ०० - शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब ठाकरेंचे पार्थिव सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार. सायंकाळी ०६ : ०० - शिवतीर्थावर अंत्यसंस्कार करण्यात येणार. शिवाजी पार्कवरील व्यवस्था मीनाताई ठाकरे पुतळा आणि समर्थ व्यायाम मंदिर प्रवेशद्वारातून सर्वसामान्यांना प्रवेश. समर्थ व्यायाम मंदिर प्रवेशद्वारानं महिलांसाठी वेगळी रांग. उद्यान गणेश येथील प्रवेशद्वारानं ठाकरे कुटुंबिय, राजकीय नेते आणि व्हीआयपींना प्रवेश. खासगी बस आणि मोठ्या वाहनांनी येणा-या शिवसैनिकांना सेनापती बापट मार्गावर पार्कींगची सूचना. पार्कींगला बंदी : वीर सावरकर रोड, रानडे रोड, एन.सी.केळकर रोड, कुळसेकर मार्ग, एल.जे.रोड, गोखले रोड, कटारिया मार्ग, सयानी मार्ग वाहतुकीमध्ये बदल : काय बंद.. काय चालू.. मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तीनही रेल्वे लाईनवरचा मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे. 'बेस्ट'तर्फे संपूर्ण मुंबई शहरातून शिवाजी पार्कच्या दिशेने जादा गाड्या सोडण्यात येणार. मुंबईत आज (रविवार) टॅक्सीसेवा बंद. टॅक्सी युनियनचा निर्णय. आज (रविवार) कामाशिवाय दादर, वांद्रे भागात जाणं तसंच वेस्टर्न एक्स्प्रेस वे चा वापर करणं टाळा - मुंबई पोलिसांचा सल्ला. आज (रविवार) महत्वाचं काम असेल तरचं बाहेर पडा - मुंबईच्या पोलिस आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन. पेट्रोलपंप बंद ठेवू नका शिवसेनेचे आवाहन. मुंबईसह राज्यात सर्व पेट्रोलपंप सुरू राहणार. मुंबईतील सर्व नाट्यगृह, सिनेमा गृह आणि मल्टिप्लेक्स दोन दिवस बंद राहणार. आज (रविवार) राष्ट्रीय प्रज्ञा शोध आणि चार्टर्ड अकांऊट, माहिती आणि प्रसारण विभागाच्या परिक्षांसह राज्यभरात होणा-या सर्व परीक्षा रद्द. संपूर्ण मराठवाड्यात उत्स्फूर्त बंदचे शिवसेनेच्या वतीने आवाहन. मुंबईत १८ आणि १९ तारखेला होणा-या मॅचेस रद्द करण्यात आल्या आहेत.