मुंबई टोल नाक्यांवरील दरात १ ऑक्टोबरपासून वाढ

येत्या १ ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करण्याच्या मार्गांवर असलेल्या टोल नाक्यांवरील टोलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

येत्या १ ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करण्याच्या मार्गांवर असलेल्या टोल नाक्यांवरील टोलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ऐरोली, वाशी, मुलुंड चेकनाका, मुलुंड जकात नाका आणि दहिसर येथील टोलनाक्यावरील दरांमध्य़े वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईत रोज ये-जा करणाऱ्या वाहनांना टोल दर वाढीचा मोठा फटका बसणार आहे.

१ ऑक्टोबरपासून लागू होणारे नवे दर पुढीलप्रमाणे;
– चारचाकी वाहने – ३५ रूपये
– मिनी बस आणि तत्सम वाहने – ४५ रुपये
– ट्रक आणि बस – ९० रुपये
– अवजड वाहने – ११५ रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Toll rate hike from 1 october in mumbai