मुंबई : गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी व्यापाऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले. राऊत यांच्या विधानानंतर व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून फेडरल ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन या व्यापारी संघटनेने संजय राऊत यांचा निषेध केला आहे. संजय राऊत यांनी तात्काळ आपले विधान मागे घेऊन व्यापाऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. माफी न मागितल्यास राऊत यांना व्यापाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या ३७० कलमावरील विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यापाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. अमित शाह खोट बोलत आहेत आणि व्यापारी आपल्या फायद्यासाठी नेहमी खोटे बोलतात. व्यापारी भेसळ करतो, ग्राहकांना फसवतो, त्यांनीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला, असे आरोप राऊत यांनी त्यावेळी केले. महाराष्ट्रात राजकारणाचा जो चिखल केलेला त्याला जबाबदार अमित शाह व त्यांचे व्यापारी असून त्यांची खा-खा वृत्ती जबाबदार आहे. गेल्या तीन – चार वर्षांत महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्र ओरबडण्यासाठी, मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी अमित शाहसारख्या व्यापाऱ्यांनी षडयंत्र रचले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राचा चिखल होण्याची वेळ आली आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>>घाटकोपरमध्ये अनधिकृत बारवर पोलिसांचा छापा; आठ बारबालांची सुटका

करोनाकाळात जीवाची पर्वा न करता व्यापाऱ्यांनी घरोघरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या बाबी उघड असताना राऊत यांनी केलेले विधान निषेधार्ह आहे. विरोधकांवर टीका करताना समाजातील इतर घटकाला राजकारण्यांनी त्यात ओढू नये. राऊत यांच्या विधानावरून महाविकास आघाडीला व्यापाऱ्यांच्या मतांची गरज नसल्याचे स्पष्ट होते. विरोधकांवर टीका करण्याच्या ओघात राऊत यांनी व्यापारी वर्गावरही आघात केला आहे. या प्रकरणी राऊत यांनी तात्काळ माफी मागावी, याबाबत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना संदेश पाठविण्यात आले आहेत. माफी न मागितल्यास मविआला व्यापाऱ्यांची ताकद दाखवून देवू, असा इशारा फेडरल ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी दिला आहे.

Story img Loader