लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर २२ ते २४ जानेवारीदरम्यान घेण्यात आलेला तीन दिवसांचा तीन तासांचा वाहतूक ब्लॉक संपुष्टात आला आहे. यामुळे वाहनचालक – प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण आता या महामार्गावर येत्या आठवड्यात पुन्हा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai-Bound exit at Panvel On Mumbai-Pune Expressway to close For 6 months
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल; ६ महिन्यांसाठी ‘हा’ एक्झिट मार्ग राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Mumbai nashik traffic jam
मुंबई – नाशिक महामार्गावर अपघात, वाहने बंद पडल्यामुळे कोंडी; खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा
Organizations strongly oppose ban on heavy vehicles Pune print news
बंदीचा ‘अवजड’ फटका; अवजड वाहनांवरील बंदीला संघटनांचा तीव्र विरोध, बेमुदत संपाचा इशारा
Mumbai-Badlapur in 60 minutes access control route with four interchange lanes including 3 km tunnel soon to be planned
मुंबई-बदलापूर अंतर ६० मिनिटांत, तीन किमीच्या बोगद्यासह चार अंतरबदल मार्गिकांच्या प्रवेश नियंत्रण मार्गाचा लवकरच आराखडा
road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
Punes Comprehensive Mobility Plan
पुण्यातल्या ट्रॅफिक जॅमवर नवा उतारा; काय आहे पुण्याचा ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’?
Why hassle of Shaktipeeth Highway when there is viable alternative
सक्षम पर्याय असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी?

द्रुतगती मार्गावरील कि.मी. क्र.५८/५०० (डोंगरगाव / कुसगाव) पुणे वाहिनी येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी तुळई (गर्डर) बसविण्याचे काम २७ ते २९ जानेवारी दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी २७ ते २९ जानेवारीदरम्यान दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. या वेळेत वाहतूक पुणे वाहिनीवरील द्रुतगती मार्गाच्या कि.मी.क्र.५४/७०० वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र.४८) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. तसेच वरील कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीवरून सुरु राहणार आहे. तर तिन्ही दिवस दुपारी ३ नंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरून सोडण्यात येईल.

तुळई बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अर्थात २९ जानेवारी रोजी दुपारी ३ नंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, वाहतूक ब्लॉक कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नियंत्रण कक्षाशी दूरध्वनी क्रमांक- ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या मोबाइल क्रमांक ९८३३४९८३३४ वर संपर्क साधावा, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.

Story img Loader