चर्चगेटहून सुटणारी शेवटची, तर अंधेरी, बोरिवलीतून सुटणारी पहाटेची पहिली लोकल रद्द

मुंबई : लोअर परळ रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या डिलाइल रोड उड्डाणपुलावर दुसरा गर्डर बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेने १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री चार तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेतले. आणखी चार ब्लॉक घेण्याचे नियोजन असून १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीही १.१० ते १७ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१० पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Air-conditioning system, Kalyan-CSMT local,
कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील वातानुकूल यंत्रणा बंद, प्रवाशांमध्ये संताप, महिलेला आली चक्कर
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

या ब्लॉकमुळे चर्चगेट येथून बोरिवलीला जाण्यासाठी मध्यरात्री १ वाजता सोडण्यात येणारी शेवटची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०४ वाजता अंधेरी येथून चर्चगेटला, तसेच पहाटे ३.५० वाजता बोरिवली येथून चर्चगेटला जाणारी पहिली लोकलही रद्द करण्यात आली आहे. चर्चगेटहून १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३१ वाजता अंधेरीला जाणारी, १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.१९ वाजता चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी लोकल आणि पहाटे ५.३१ वाजता बोरिवली येथून चर्चगेटला रवाना होणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. लोअर परेल उड्डाणपुलाच्या कामासाठी १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून चार दिवस ब्लॉक घेऊन ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. गर्डर बसविणे आणि अन्य कामांसाठी हे ब्लॉक घेण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा <<< ‘अनाथ’ हा शब्द कलंक कसा?; उच्च न्यायालयाची विचारणा

पुढील लोकल वेळापत्रकात बदल

– बोरिवलीहून (१६ सप्टेंबर) मध्यरात्री ००.३० वाजता चर्चगेटसाठी सुटणारी धीमी लोकल अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रलदरम्यान अतिरिक्त जलद लोकल म्हणून चालवली जाईल.

– विरारहून (१६ सप्टेंबर) मध्यरात्री ००.०५ वाजता चर्चगेटसाठी सुटणारी लोकल बोरिवली-अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रलदरम्यान अतिरिक्त जलद लोकल म्हणून चालवली जाईल.

– चर्चगेटहून (१७ सप्टेंबर) पहाटे ०४.१५ वाजता सुटणारी विरार धीमी लोकल दादरहून पहाटे ४.३६ वाजता सुटेल. त्यामुळे चर्चगेट ते दादर दरम्यान ही ट्रेन अंशतः रद्द राहणार आहे.

– चर्चगेटहून (१७ सप्टेंबर) पहाटे ०४.३८ वाजता सुटणारी बोरिवली धीमी लोकल वांद्रे स्थानकातून पहाटे ०५.०८ वाजता सुटेल.

– विरारहून (१७ सप्टेंबर) पहाटे ०३.२५ वाजता सुटणारी चर्चगेट धीमी लोकल १५ मिनिटे उशिराने सुटेल.

– नालासोपारा येथून (१७ सप्टेंबर) पहाटे ०३.४० वाजता सुटणारी बोरिवली धीमी लोकल ही विरार-चर्चगेट धीमी लोकल सुटल्यानंतर उशिराने सुटणार आहे.

-भाईंदरहून (१७ सप्टेंबर) पहाटे ०४.०५ वाजता सुटणारी चर्चगेट जलद लोकल पंधरा मिनिटे उशिराने सुटेल.

– विरारहून (१७ सप्टेंबर) पहाटे ०३.५३ वाजता सुटणारी चर्चगेट जलद लोकल पाच मिनिटे विलंबाने सुटेल.

– बोरिवलीहून (१७ सप्टेंबर) पहाटे ०४.०२ वाजता सुटणारी चर्चगेट धीमी लोकल दादरपर्यंत चालवली जाईल आणि माटुंगा रोड, माहीम स्थानकावर थांबणार नाही. उलट दिशेने दादर-विरार जलद लोकल म्हणून धावेल. त्यामुळे दोन्ही लोकल दादर आणि चर्चगेट दरम्यान अंशत: रद्द राहतील.

-बोरिवलीहून (१७ सप्टेंबर) पहाटे ०४.१४ वाजता सुटणारी चर्चगेट धीमी लोकल वांद्र्यांपर्यंत चालवली जाईल. उलट दिशेने ती वांद्रे-बोरिवली धीमी लोकल म्हणून चालवली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्या वांद्रे ते चर्चगेट दरम्यान अंशत: रद्द राहतील.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्टक्चर डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) पश्चिम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या आणखी तीन उड्डाणपुलाच्या कामाची सद्यस्थिती

१ मुंबई सेंट्रल जवळील बेलासिस उड्डाणपूल – पुलाच्या कामासाठी दरपत्रक अंतिम करण्याचे काम प्रगतीपथावर. त्यानंतरच नवीन गर्डर वैगरे बसविण्याचे काम

२) प्रभादेवी स्थानक कॅरोल उड्डाणपूल – केबल, अन्य वायर तसेच पुलाजवळील अन्य वस्तू काढण्याचे काम सुरू. रेल्वे हद्दीतील हा पूल एमआरआयडीसी करणार

३) महालक्ष्मी उड्डाणपूल – मुंबई महानगरपालिका आणि एमआरआयडीसीकडून गर्डर आणि अन्य कामासाठी अंतिम निर्णय होणे बाकी आहे.