दिवाळीची सुटी संपल्यामुळे मुंबईकडे माघारी निघालेल्या प्रवाशांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड येथे सुटी घालवण्यासाठी गेलेले नागरिक आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. परंतु अचानक गर्दी वाढल्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास वेळ लागत आहे. वडखळ ते धरमतर दरम्यान वाहनाच्या लांब रांगा लागल्या आहेत. रायगड-पेण-अलिबाग मार्गावरही देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास वेळ लागत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-11-2016 at 20:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in mumbai goa highway